Shivsena vs. Congress News : विधानसभेत काँग्रेसच्या जागा वाढतील, पण…शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक विधान

Political News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडले आहे. त्यानंतर सर्वच पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि उबाठा गटाची युती होणार नाही. काँग्रेसवाले त्यांना वाटाघाटीसाठी सुद्धा बोलत नाहीत. उबाठा गट शरद पवार यांच्यावर अवलंबून आहे. ते ज्या दिवशी हात काढून घेतील, त्यावेळी ठाकरे गटाला त्यांची जागा दिसेल, एक वेळा काँग्रेसच्या जागा वाढतील, पण शिवसेना उबाठा गटाच्या जागा वाढणार नाहीत,असा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हल्ला चढविला आहे. (Shivsena vs. Congress News )

संजय राऊत हे कधीच लोकांना भेटत नाहीत. कधी ग्राउंडवरही जात नाहीत. यामुळे 288 पैकी 290 जागा जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही, शिवसेना ठाकरे गटाचा स्वाभिमान सिल्वर ओकच्या दाराशी उभा आहे. त्यामुळे येत्या काळात ही आघाडी होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले हे सगळ्यांना माहीत आहे. स्वत: शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केले, हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे. महायुतीच्या योजनांवर केवळ विरोधकांकडून टीका केली जात असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) केला.

MVA- Mahayuti
Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचा दावा, आघाडीची धडधड वाढली; 'या' आमदारांसाठी धोक्याची घंटा

लवकरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

येत्या काळात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याचा अर्थ विस्तार होईल, पण तो कधी होईल ही वेळ नक्की कुणी सांगू शकत नाही, असेही यावेळी शिरसाट यांनी स्पष्ट केले.

अजित पवार हे महायुतीतच राहतील

येत्या काळात अजित पवार हे महायुतीतच राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकते. त्यामुळे नेमके काय घडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या राज्यात शांतता राहावी, अशी आमची अपेक्षा आहे. जरांगे पाटील यांनी कुणाला चर्चेला बोलावले हे माहीत नाही. पण चर्चेतून प्रश्न सुटतात यावर आमचा विश्वास आहे. असे संजय शिरसाट म्हणाले.

MVA- Mahayuti
Mumbai Shivsena : शिंदे गटाचा मोठा निर्णय! 'या' शहरांची कार्यकारिणी बरखास्त; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com