Ashok Chavan On Congress News : लोकसभेचे मतदारसंघ सुटसुटीत झाले तर गैर काय? काँग्रेसने उगाच खोडा घातला! अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सुनावले

Reservation Bill Reaction News : लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत, ते सुटसुटीत झाले पाहिजेत यासाठी मोदी सरकारने बील आणले तर त्यात गैर काय? असा सवाल करत चव्हाण यांनी काँग्रेसला फटकारले.
Ashok Chavan On Opration Sindoor News
Ashok Chavan On Opration Sindoor NewsSarkarnama
Published on
Updated on

Reservation Bill Reaction News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने आणलेले नारीशक्ती वंदन हे महिला आरक्षणाचे बील काल बहुमताअभावी नामंजूर झाले. त्यानंतर भाजपाने काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्या राजकीय जीवनातील सर्वाधिक काळ ज्या काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण यांनी व्यथित केला. त्याच अशोक चव्हाण यांनी आता महिला आरक्षण विधेयकाला विरोध करत त्यात खोडा घातल्याचा आरोप केला.

लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत, ते सुटसुटीत झाले पाहिजेत यासाठी मोदी सरकारने बील आणले तर त्यात गैर काय? असा सवाल करत चव्हाण यांनी काँग्रेसला फटकारले. वैयक्तिक टीका न करता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते. मतदारसंघांमध्ये समानता आणली पाहिजे, असा विचार सरकारने केला तर यात काय चुकले? असा सवाल त्यांनी केला.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Congress News : काँग्रेस हिंगोलीत कमबॅकच्या तयारीत; प्रज्ञा सातव, अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्षच मैदानात!

मला मान्य आहे की काँग्रेसच्या (Congress) काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कुणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की माझी टीका वैयक्तिक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला, त्याची गरज नव्हती. हे विधेयक विरोधकांनी मंजूर होऊ द्यायला हवे होते.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Maharashtra budget 2026 : CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या आमदारावर पलटवार; म्हणाले, 'तुमच्या कर्जापेक्षा राज्यावरचे कर्ज कमी...'

अमित शाह (Amit Shah) यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारने सगळी तयारी केली होती. मतदारसंघ पुनर्रचनेतून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केले. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यात विरोधकांनी सकारात्मक भूमिका वठवायला हवी होती. महिला आरक्षणासारखा महत्वाचा विषय मार्गी लागला असता तर त्याचे श्रेय मोदी सरकारला मिळाले असते, तेच काँग्रेसला नको होते, म्हणून त्यांनी अडवणूक केली, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Nanded News: नांदेडमध्ये काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांचा पक्षाला 'हात, 'एमआयएम'मध्ये केला प्रवेश; अशोक चव्हाणांनी डाव टाकल्याची चर्चा!

काँग्रेसला भवितव्य नाही..

देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची गेल्या वीस वीस वर्षांपासून सत्ता नाही. काँग्रेसकडे आता केडरच उरलेले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसची हीच अवस्था आहे. पण केंद्रातील त्यांच्या नेतृत्वाला याचे काही सोयर सुतक नाही. भविष्यात काँग्रेसला भवितव्यच उरलेले नाही. त्यांच्या अनेक नेत्यांना हे लक्षात आले आहे आणि म्हणून ते भाजपाच्या वाटेवर आहेत, असा गौप्य स्फोटही अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Ashok Chavan : नांदेड महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसचे अशोक चव्हाणांना साकडे? माजी महापौरांच्या मुलाने घेतली भेट, चर्चांना उधाण

खाल्ल्या मिठाला जागा..

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या टीकेला काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत ज्या काँग्रेस पक्षाशी आपले वडील दिवंगत शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच काँग्रेससोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच 'नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023', म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले असल्याची आठवण करून दिली. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असा टोलाही काँग्रेसने चव्हाण यांना लगावला

Ashok Chavan On Opration Sindoor News
Mahayuti Politics : अशोक चव्हाण यांनाच टार्गेट केलेल्या शिंदेंच्या शिवसेनेशी भाजपला करावी लागणार युतीची बोलणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com