Vande Mataram Controversy: काँग्रेस पुन्हा वादात; स्वातंत्र्य दिनानंतर गोव्यातही ‘वंदे मातरम’ची दोनच कडवी; भाजपची तळपायाची आग मस्तकात...

Goa News: स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या संपूर्ण गायनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस वंदे मातरमवरुन वादात सापडली आहे.
Congress Vande Mataram Controversy  .jpg
Congress Vande Mataram Controversy .jpgSarkarnama
Published on
Updated on

Goa News: देशभरात एकीकडे 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे 'वंदे मातरम' गीतावरून नवा वाद पेटला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या संपूर्ण गायनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस वंदे मातरमवरुन वादात सापडली आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना वंदे मातरम सुरू असतानाच ते थांबवण्याचा इशारा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरुन भाजपकडूनराष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने गंभीर आरोप केले होते. हे सर्व आरोप फेटाळून लावत काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार केला होता. आता काँग्रेस पक्षाची कृती राष्ट्रगीताच्या नव्या वादाला तोंड फोडणारी ठरली आहे.

काँग्रेसच्या गोवा येथील बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीतच ‘वंदे मातरम’ची दोनच कडवी गाण्यात आल्याचा दावा भाजपकडून सोशल मीडियावर ट्विट करत केला आहे. गोवा येथे काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केवळ सुरुवातीचे दोनच कडवे म्हटली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. यामुळेच भाजपनं पुन्हा एकदा काँग्रेसला वंदे मातरमवरुन टार्गेट केलं आहे.

भाजपकडून मंगळवारी (ता.18 ऑगस्ट) काँग्रेसला लक्ष्य करत सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाजपने ‘ही चूक नाही, ही मानसिकता आहे असल्याचा टोला लगावला आहे. तसेच ‘वंदे मातरम’वर काँग्रेसचे लज्जास्पद रूप!’ “मी तर कुठेही गात नव्हतो आणि गाणारही नाही,” असा उल्लेख करत भाजपनं काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Congress Vande Mataram Controversy  .jpg
Sharad Pawar NCP : शरद पवारांनी पुण्यासह ठाण्यात भाकरी फिरवली; श्रीकांत पाटील, विशाल तांबे, खासदार म्हात्रेंच्या खांद्यावर धुरा...

भाजपने ट्विटमध्ये “जेव्हा काँग्रेस नेत्यांच्या तोंडून राष्ट्रगीताच्या विरोधात असे विष बाहेर पडते, तेव्हा द्वेष किती खोलवर आहे, हे समजत असल्याचं म्हटलं आहे. याचदरम्यान, सोनिया-राहुल यांची ही मानसिकता संपूर्ण देश पाहत आहे! राष्ट्रगीताचा अपमान देश कधीही माफ करणार नसल्याचंही भाजपनं सांगत काँग्रेसवर आरोपांची तोफ डागली आहे.

काँग्रेस नेते ‘वंदे मातरम’वर काय म्हणाले?

आमदार एल्टन डीकोस्टा यांनी गोव्यातील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात अपूर्ण ‘वंदे मातरम’ गाण्यात आल्याच्या आरोपावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मला याबाबत जास्त काही बोलायचे नाही. आमच्या अध्यक्षांनी यावर आधीच उत्तर दिले आहे. आम्हाला कोणासमोरही आमची देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचे नेते या देशावर किती प्रेम करतात, हे सांगण्याचीही आम्हाला गरज नसल्याचंही रोखठोक मत त्यांनी व्यक्त करत भाजपला प्रत्यत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com