
Sujay Vikhe Patil News : शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून भक्तांना मोफत अन्नदान केले जाते. मात्र, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोफत अन्नदानाबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'संस्थानाकडून मोफत अन्नदान करण्यात येते त्यामुळे अख्या देश येऊन जेवून जातो. महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जमा होतात.हे योग्य नाही.', असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
संस्थानानी विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत? काय केलं पाहिजे. कोट्यावधी रुपये खर्चून चांगले शैक्षणिक संकुल बांधले. शैक्षणिक संकुल चांगले आहे पण इंग्रजीच्या शिक्षकालाच इंग्रजी शिकवता येत नाही तो मराठीतून इंग्रजी शिकतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केरळमधून शिक्षक आले पाहिजे. गुणवत्तेवर खर्च करा, असे सुजय विखे पाटील
'प्रसादलायमधील मोफत जेवण बंद करावे. ग्रामस्थांनी मिटींग घेऊन आंदोलनाची गरज पडली तर आम्ही आंदोलन करू. हा जो पैसा चालला तो जेवणासाठी जात नाही. अन्नदानासाठीचा पैसा आमच्या मुलींच्या शिक्षणासाठी घालवा.', असे देखील सुजय विखे म्हणाले.
सुजय विखे म्हणाले, कोट्यावधीचा निधी खर्च करून शैक्षणिक संकुल बांधले, त्यात विविध सुविधा आहेत. पण शिक्षणाच्या गुणवत्तेवार खर्च करा, हवं तर शिक्षकाला दीड लाख रुपये पगार द्या पण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा शिक्षक नेमा. शाळा झाडाखाली भरली तरी चालेल पण शिक्षण गुणवत्तापूर्ण मिळाले पाहिजे.
संस्थाचे काम हे भक्तांची काळजी घेणे आहे. त्यांना सुविधा पुरावणे आहे. दवाखाना उभारला पण फक्त 25 टक्केच स्थानिक उपचार घेतात. 75 टक्के बाहेरचे आहे. त्यामुळे स्थानिकांना फायदा होईल, स्थानिकांना लाभ मिळेल, अशा योजना राबवा, असा सल्ला देखील सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानाला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.