Santosh Deshmukh Murder : SITतील अधिकाऱ्याचा ‘तो’ फोटो ट्विट करत दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी...

Anjali Damania Demand : आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एसआयटीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर बोट ठेवले आहे. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?
Anjali Damania
Anjali Damania Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 05 January : संतोष देशमुख खून प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना केली आहे. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पथकात बीड पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील एका अधिकाऱ्याचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ही एसआयटीच बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सीआयडी आणि एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या एसआयटीची सर्व सूत्रे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तेली यांनी तपासकामी अधिक अधिकाऱ्यांची देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने तेली यांना मदत व्हावी, यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पथकात केली आहे.

एसआयटी पथकामध्ये बीड पोलिसांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंंग शिवलाल जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस शिपाई संतोष गित्ते यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यातील महेश विघ्ने या पोलिस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड याच्यासोबतचा एक फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला आहे. विघ्ने आणि कराडचा फोटो ट्विट करत संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी नेमण्यात आलेली एसआयटी बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

Anjali Damania
Ratnakar Gutte : आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू सापडला नाशिकच्या मनमाडमध्ये...

आपल्या एक्स अकाउंटवर दामनिया यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री, ताबतोब ही SIT बरखास्त करा. बीड पोलिसांनी ही चौकशी करणे अयोग्य आहे. खूपशा पोलिस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध. जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांना ON Camera चौकशीचे आदेश तात्काळ द्या, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

आव्हाडांनीही उघड केले पोलिस अधिकारी आणि कराडचे संबंध

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एसआयटीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर बोट ठेवले आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT चा प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलिस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?

Anjali Damania
Sudhir Mungantiwar : मंत्रिपद न मिळण्याचे खुद्द सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले कारण...

याच विघ्ने याने निवडनुक काळात धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असा आरोप आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com