
Mahayuti News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सुमारे साडेतीन महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र निवडणुकीच्या निकालावरची शंका अद्याप निवळली नाही. महायुतीचे उमेदवार ज्या संख्येने निवडूण आले आणि विजयाची खात्री असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले, त्यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. यातील तीन प्रकरणात महायुतीच्या विदर्भातील तीन आमदारांना उच्च न्यायलयाने उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. भाजपचे प्रताप अडसड, संजय कुटे तर शिवसेनेचे संजय गायकवाड यांचा यात समावेश आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष तीनही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी झाली. प्रताप अडसड यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विरेंद्र जगताप (धामणगाव, जि. अमरावती), संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके (बुलढाणा) आणि संजय कुटेंविरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर (जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकांमध्ये ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर 17 दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आलेत.
न्यायालयाने निवडणूक आयोग तसेच अन्य पक्षकारांची नावे वगळण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यासाठी त्यांना चार आठवड्यांचा अवधी दिला. उमेदवार शेळके व वाकेकर यांच्याकडून ॲड. आकाश मून व ॲड. पवन डहाट तर जगताप यांच्याकडून ॲड. ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.