M K Stalin: सीएम स्टॅलिन यांचा लग्नातच नवविवाहित दाम्पत्याला अजब सल्ला; म्हणाले,आता थांबू नका,लगेच...

Tamilnadu CM M K Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च रोजी सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवत राज्याच्या भविष्याचा विचार करुन सत्ताधारी व विरोधक अशा सर्वांनी एकत्र येऊयात असं आवाहन केलं आहे.
m k stalin.jpeg
m k stalin.jpegSarkarnama
Published on
Updated on

Tamilnadu News : काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील लोकसंख्या स्थिर करण्यासाठी महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत, असे सुचवले होते.या विधानानंतर काही दिवसांतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M K Stalin) यांनीही लोकसभा पुनर्रचना प्रक्रियेनंतर लोकांना 16 मुले जन्माला घालण्याचा विचार करावा लागेल,असे विधान केलं होतं.

यामुळे एकीकडे भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच दुसरीकडे या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता पुन्हा एकदा स्टॅलिन यांनी नवविवाहित जोडप्यांनी लग्नानंतर थांबू नये लगेच मुले जन्माला घालावी, असं विधान केलं आहे

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी राज्यातील एका सचिवाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूर्वी आपण वेळ घ्या आणि मग मुलांना जन्माला घाला असं विधान करत असायचो. पण आता परिस्थिती बदलली आहे. लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांनी थांबू नये, लगेच मुलं जन्माला घालावी. आपण कुटुंब नियोजन योजन यशस्वीरित्या राज्यात राबवलं आहे. पण त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागत असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

गेल्या महिन्यात तामिळनाडू (Tamilnadu) सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले,कुटुंब नियोजन धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आता आपल्याच तामिळनाडू राज्याचं नुकसान झालं आहे. लोकसंख्या जनगणनेच्या आधारे सीमांकन लागू करण्यात आलं तर तामिळनाडूंची 8 खासदारांची संख्या कमी होईल.यामुळे तामिळनाडू संसदेत प्रतिनिधित्व गमावेल अशी भीतीही स्टॅलिन यांनी व्यक्त केली होती.

m k stalin.jpeg
Vanchit Bahujan Aaghadi : भाजपच्या आमदाराचा निरोप धुडकवला; वंचितचा 'झुकेगा नहीं'चा इशारा

यापूर्वीही स्टॅलिन यांचं विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी 21 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती.त्यावेळी 31 दाम्पत्यांचा विवाह झाला होता.ते म्हणाले, आता दाम्पत्यांनी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे, आल्याचं म्हटलं होतं.

तामिळनाडू सरकारनं सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवत राज्याच्या भविष्याचा विचार करुन सत्ताधारी व विरोधक अशा सर्वांनी एकत्र येऊयात असं आवाहन केलं आहे.

m k stalin.jpeg
Beed News : महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना महिनाभरात अटक करणार! पोलीसांचा शब्द, कुटुंबियांचे उपोषण स्थगित

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत 40 राजकीय पक्षांना मतदारसंघांच्या सीमांकनाच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी बैठकीला आमंत्रित करण्यात आलं आहे. अहंकार बाजूला ठेवा. माझं आवाहन का ऐकावं याचा विचार न करता तामिळनाडूसाठी हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com