Shivaji Kalge News : लातुर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे खासदार शिवाजी काळगे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातीसाठी लातूर मतदारसंघ राखीव होता.मात्र, शिवाजी काळगे यांच्या जात प्रमाणपत्र वैध नसल्या विषयी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात (औरंगाबाद) दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
जात वैधता प्रमाणपत्र याचिकेवरून खासदार काळगे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची पूर्तता करावी अशा सूचना हायकोर्टाने खासदार काळगे यांना दिल्या आहेत.
लातुर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर श्रृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यात लढत झाली होती. श्रृंगारेंच्यासाठी निवडणूक अवघड जाणार असे वर्तवले जात होते. काळगे यांच्यासाठी अमित देशमुख यांनी मोठी ताकद लावली होती. देशमुख कुटुंब काळगे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
सलग दोन वेळा लातुरमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे काँग्रेस समोर मोठे आवाहन असल्याचे सांगितले जात होते. मात्र, 61 हजार 881 मतांनी काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे विजयी झाले होते..
लिंगायत समाजातील असलेले काळगे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. येत्या 2 सप्टेंबर 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी असे कोर्टाने दिलेल्या नोटीस म्हटले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.