Ajit Pawar : बारामतीत रस नाही म्हणणाऱ्या अजितदादांना शिरूरमधून लढण्याचे निमंत्रण; पवारांनी काय दिले उत्तर?

Shirur Assembly Election : रवीबापू काळे काय म्हणत आहेत, याकडे माझे पूर्ण लक्ष नसले तरी त्यांना काय म्हणायचं आहे, ते मला समजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा येतात, ते पाहू. तसेच त्या जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेताना जिंकून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल.
Ajit Pawar-Ravi Bapu Kale
Ajit Pawar-Ravi Bapu KaleSarkarnama
Published on
Updated on

Pune, 19 August : बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी रस नाही म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरूर-हवेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी केली.

काळे यांच्या मागणीवर उपस्थितांमधूनही जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र, काळे यांना काय म्हणायचे, हे माझ्या लक्षात आले आहे. महायुतीत कुठची जागा कोणाला सुटते, हे पाहूनच शिरूर-हवेलीच्या उमेदवारीचा निर्णय जिंकण्याच्या मेरीटवर घेऊ, असे अजितदादांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा रविवारी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे आली होती. यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही सणसवाडीत आले होते.

त्या यात्रेत बोलताना पक्षाचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे (Ravi Bapu Kale) यांनी अजित पवार यांच्याकडे पाहत ‘दादा, आता तुम्ही शिरूर हवेलीतून उभं राहावं’, अशी विनंती केली. काळे यांच्या मागणीवर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे रवीबापूंच्या मागणीवर अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अजित पवार यांनी भाषणाच्या शेवटी रवीबापू यांच्या विनंतीवर भाष्य केले. ते म्हणाले, रवीबापू काळे काय म्हणत आहेत, याकडे माझे पूर्ण लक्ष नसले तरी त्यांना काय म्हणायचं आहे, ते मला समजले आहे. महायुतीची आज (ता. 19 ऑगस्ट) रात्री उशिरा बैठक होत आहे. त्यात कोणत्या जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या यावर चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा येतात, ते पाहू. तसेच त्या जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेताना जिंकून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल, एवढंच सांगतो.

Ajit Pawar-Ravi Bapu Kale
Devendra Fadnavis : शिवसेना नेत्यावर देवेंद्र फडणवीस नाराज; एकनाथ शिंदेंशी बोलण्याचा गर्भित इशारा

तालुकाध्यक्ष काळे यांच्या मागणीवर अजित पवार यांनी थेट नकारही दिला नाही, तसेच सहमतीही दर्शवलेली नाही. त्यामुळे बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही म्हणणारे अजितदादांच्या शिरूरमधील उमेदवारीचा सस्पेंस वाढविला आहे. आता दादा नेमकं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांची उमेदवारी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निश्चित समजली जाते. मात्र, अशोक पवारांच्या विरोधात महायुतीकडून कोण निवडणूक लढविणार,याची उत्सुकता वाढली आहे.

Ajit Pawar-Ravi Bapu Kale
Mahayuti Dispute : महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; राष्ट्रवादी अन्‌ तटकरे विश्वासघातकी, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

शिरूरमधून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, तालुकाध्यक्ष रवी काळे इच्छुक आहेत. शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हेही इच्छूक आहेत. मात्र, आता अजितदादांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने महायुतीकडून नेमकं कोण निवडणूक लढविणार याची उत्सुकता वाढली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com