CTET vs TET Exam : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसाठी 'ही' परीक्षा पास होणं कठीण? CTET की TET... कोणती परीक्षा आहे टफ?

CTET TET exam difficulty comparison : CTET आणि TET पैकी कोणती परीक्षा अधिक कठीण आहे? शिक्षक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न आणि दोन्ही परीक्षांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या.
CTET vs TET Exam : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसाठी 'ही' परीक्षा पास होणं कठीण? CTET की TET... कोणती परीक्षा आहे टफ?
Published on
Updated on

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CTET उत्तीर्ण होणे आता महत्त्वाचे ठरत आहे. विशेषतः सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीही पात्रता परीक्षेची अट लागू झाल्याने अनेक शिक्षक परीक्षा देण्याची तयारी करत आहेत. मात्र, अनेक शिक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे, CTET सोपी की State TET? दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नांची पद्धत आणि राज्यनिहाय नियम वेगळे असल्याने याचे उत्तर प्रत्येक उमेदवाराच्या तयारीवर अवलंबून आहे.

शिक्षकांसाठी TET किंवा CTET का महत्त्वाची?

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2025 मध्ये दिलेल्या निर्णयात TET ही शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असल्याचे स्पष्ट केले होते. सेवेत असलेल्या शिक्षकांनाही संबंधित नियम लागू होऊ शकतात. यासाठी पात्रता मिळवण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी कायम ठेवण्यासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनेक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

CTET vs TET Exam : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसाठी 'ही' परीक्षा पास होणं कठीण? CTET की TET... कोणती परीक्षा आहे टफ?
Top 10 News : राज्यात 5 हजार 12 प्राध्यापकांची भरती सुरू अन् गोकुळमध्ये रात्री बारा वाजता निर्णय बदलला; वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

CTET आणि State TET मध्ये नेमका फरक काय?

CTET म्हणजे Central Teacher Eligibility Test. ही परीक्षा CBSE कडून घेतली जाते आणि केंद्रीय स्तरावरील शिक्षक भरतीसाठी तिचा उपयोग होतो. तर State TET ही संबंधित राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा असते. महाराष्ट्रात MAHA TET, उत्तर प्रदेशात UPTET, राजस्थानात REET यांसारख्या परीक्षा घेतल्या जातात.

दोन्ही परीक्षांमध्ये साधारणपणे 2 पेपर असतात. Paper 1 हा इयत्ता 1 ते 5 आणि Paper 2 हा इयत्ता 6 ते 8 साठी असतो. पात्रतेनुसार उमेदवार दोन्ही पेपरही देऊ शकतो.

प्रश्नपत्रिका कशी असते?

CTET आणि TET मध्ये 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि एकूण 150 गुण असतात. परीक्षा सोडवण्यासाठी 2 तास 30 मिनिटांचा वेळ दिला जातो. चुकीच्या उत्तरासाठी सामान्यतः नकारात्मक गुणांकन नसते.

सामान्य प्रवर्गासाठी 60 टक्के म्हणजे 90 गुण मिळवणे आवश्यक असते. आरक्षित प्रवर्गासाठी CTET मध्ये 55 टक्के गुणांची सवलत आहे. State TET मध्ये पात्रता गुण संबंधित राज्याच्या नियमांनुसार बदलू शकतात.

CTET vs TET Exam : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसाठी 'ही' परीक्षा पास होणं कठीण? CTET की TET... कोणती परीक्षा आहे टफ?
अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो का काढला? सरकारी कार्यालयांत कुणाचे फोटो लावतात? काय आहे प्रोटोकॉल?

अभ्यासक्रमात काय फरक?

Paper 1 मध्ये बाल विकास आणि शिक्षणशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित आणि पर्यावरण अभ्यास असे विषय असतात. Paper 2 मध्ये बाल विकास आणि शिक्षणशास्त्र, दोन्ही भाषा आणि संबंधित मुख्य विषयाचा समावेश असतो.

CTET चा अभ्यासक्रम प्रामुख्याने NCERT आधारित असतो. State TET मध्ये संबंधित राज्याच्या SCERT अभ्यासक्रमासोबत स्थानिक भाषा, अभ्यासक्रम आणि राज्याशी संबंधित घटकांवरही प्रश्न येऊ शकतात.

मग CTET की TET, कोणती परीक्षा सोपी?

वर्गात शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि बालमानसशास्त्राची चांगली समज असलेल्या शिक्षकांना CTET तुलनेने सोपी वाटू शकते. कारण प्रश्नांमध्ये संकल्पना आणि अध्यापन पद्धतीला महत्त्व असते.

दुसरीकडे, पाठांतर, व्याकरण, सूत्रे आणि राज्याच्या अभ्यासक्रमाची चांगली तयारी असलेल्या उमेदवारांना State TET सोपी जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com