

Dattatray Bharne News : साखरेचे दर ५० रुपयांवरून थेट ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमाडणार आहे. इथेनॉल उत्पादनामुळे ही दरवाढ झाल्याचे जाणकार सांगत असले, तरी या साखर दरवाढीचा अखेर शेतकऱ्यांनाच फायदा होणार असल्याचा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
भरणे म्हणाले, "बँकांच्या कर्जामुळे बहुतांश साखर कारखान्यांकडे साखरेचा पुरेसा साठा शिल्लक नाही. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे अतिरिक्त साठा आहे, त्यांना आणि पर्यायाने साठवणूक क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांनाही या दरवाढीचा फायदा होईल."
ठराविक भागातच पाऊस झाला आहे. त्यावर बोलता ते म्हणाले, काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे, तर काही भाग अजूनही कोरडे आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असला तरी कालव्यांची वहनक्षमता मर्यादित असल्याने गरजेनुसार सर्वत्र पाणी पोहोचवणे शक्य होत नाहीये. त्यामुळे आता चांगल्या पावसासाठी श्रीविठ्ठलाला साकडे घालण्याशिवाय पर्याय नाही. येत्या काळात पाऊस झाल्यास साठवण व पाझर तलाव भरून शेतकऱ्यांचा दिलासा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधावर होत असलेल्या विरोधावर बोलताना भरणे म्हणाले, "पूर्वीचा आकृतीबंध तयार करताना भौगोलिक परिस्थितीचा योग्य विचार झाला नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. संघटनांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो मागे घेण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधूनच नवीन आकृतीबंध तयार केला जाईल."
आपल्या दिलखुलास शैलीबद्दल बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी तरुणाईला आणि ग्रामस्थांना आनंदी राहण्याचा मंत्र दिला. "आपल्या कृतीमुळे जर कोणी आनंदी होत असेल, तर त्यात काय चुकीचे आहे? मी मंत्री असलो तरी लग्नाच्या वरातीत मुलांनी बोलावले तर मी त्यांच्यासोबत नाचतो, लहान मुले गोट्या खेळताना दिसली तर त्यांच्यासोबत गोट्याही खेळतो. आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे स्वतः मनमोकळेपणाने आनंदी राहावे आणि इतरांनाही आनंद द्यावा,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.