

Gulabrao Patil Controversy News : एकीकडे आस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा अद्याप त्रास कमी झाला नसून, शेतकरी कर्जमाफीतही २ लाखांपर्यंत कर्जमाफी होताना दिसत नाही. याबाबत आता शेतकरी आरोप करत असतानाच, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी "शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा, पण उद्योजकांना नको" असे वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. अशातच राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. भरणे यांनी गुलाबराव पाटील यांची मूळ भावना समजून घ्या, असे म्हटले आहे.
जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे वक्तव्य केलं होतं. त्यांनी, विजेअभावी शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा, पण उद्योजकांना नको, असे धक्कादायक वक्तव्य केलं होते. या धक्कादायक वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील निशाणा साधला होता.
याच विधानामुळे गुलाबराव पाटील यांची कोंडी होत असतानाच, आता महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. भरणे यांनी, तो मेळावा उद्योजकांचा होता. छोटासा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ते वक्तव्य केलं. पण ते शेतकऱ्यांसाठी नव्हता.
गुलाबराव पाटील हे स्वत: शेतकरी असून, ते 'आम्ही सहन करतोय' असे म्हणाले. पण उद्योजकांना ते सहन होणारे नाही, असे म्हणाले. त्यांच्या अर्थाचा अनर्थ झाला. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, गुलाबराव पाटील हे स्वत: हाडाचे शेतकरी असून, त्यांची शेतकऱ्यांविषयी भावना ही खूप चांगली आहे. ते बोली भाषेत बोलल्याने त्यांचा अर्थ थोडा चुकीचा लावला. आता त्यांच्या या विधानाचा अनेकांना गैरसमज झाला असून, त्यामागील मूळ भावना समजून घेण्याची गरज असल्याचेही भरणे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.