Investment in Maharashtra : यंदा 'दावोस'मधून राज्यात वाहणार गुंतवणुकीची गंगा?

CM Eknath Shinde in Davos : अयोध्या सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमसाठी उपस्थित राहणार?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

देशावर अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे गारूड असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आणखी एक खुशखबर देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. ते 22 जानेवारीपूर्वी दावोसमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

अयोध्येत 22 जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दावोस परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या परिषदेत ते राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणण्याच्या तयारीत आहेत. यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर असतील, असेही कळते.

Eknath Shinde
Dombivli Politics : सरकारमधल्या भाजप-शिंदे गटातच लागली चढाओढ; शक्तिप्रदर्शनाची भारीच हौस...

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांकडून सरकारला वारंवार धारेवर धरले जात आहे. मात्र कोणताही उद्योग राज्याबाहेर गेलेला नसून येणाऱ्या काळात राज्यात आणखी मोठ्या उद्योगांची गुंतवणूक होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून येणाऱ्या उद्योग, प्रकल्पांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या प्रारंभी दिली आहे.

त्यातच आता मुख्यमंत्री 15 ते 18 जानेवारी या कालावधीत दावोसचा दौरा करण्याची शक्यता आहे. राज्यातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे दावोसमध्ये जगभरातील गुंतवणूकदार आणि उद्योगप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. तसेच उद्योगसमूहांसोबत कोट्यवधींची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केले जाण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन आणि इतर जवळपास 17 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच नुकतेच सिंधुदुर्गमध्ये होणारा पहिला पाणबुडी प्रकल्पदेखील गुजरातला गेल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील कोणताही प्रकल्प गुजरातला गेला नसून विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पांसाठी उद्योग मंत्रालयाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात नव्या प्रकल्पांची गुंतवणूक होणार त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

Eknath Shinde
Sanjay Raut : राज्यात उद्भवलेली परिस्थिती अभूतपूर्व ; टँकरचालक संपावरून राऊतांचा हल्लाबोल...

गेल्यावर्षी मुख्यमंत्री शिंदेंनी दावोस परिषदेला हजेरी लावली होती. त्यावेळी उद्योगांशी तब्बल 1 लाख 37 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचे शिष्टमंडळ दावोसला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असतील. दरम्यान, गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात झालेल्या खर्चावरून विरोधकांनी टीकेचे बाण सोडले होते.

Eknath Shinde
Mahavikas Aghadi : 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काय ठरलं ? नाना पटोलेंचं मोठं भाष्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com