Mahavikas Aghadi : 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काय ठरलं ? नाना पटोलेंचं मोठं भाष्य

Nana Patole and Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार ?
Nana Patole and Prakash Ambedkar
Nana Patole and Prakash Ambedkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे 'इंडिया' आघाडीच्या, तर दुसरीकडे 'महायुती'च्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मात्र, लवकरच हा फॉर्म्युला ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीही महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबरोबरच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'वंचित बहुजन आघाडी'ला देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत घेण्यासाठी काँग्रेस हायकमांडला पत्रदेखील लिहिले आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली, तर आगामी लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा ठरणार ? कोणत्या पक्षाला किती जागा सुटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole and Prakash Ambedkar
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आजपासून मुंबईत 'ठिय्या'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत मोठं विधान केलं आहे. 'वंचित बहुजन आघाडी'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं सुरू आहे. मात्र, आमचं अद्याप बोलणं झालेलं नाही. प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांशी बोलले आहेत. त्यासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भातील निर्णयदेखील दिल्लीत केला जाईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी सरकारने जे कायदे आणले, त्या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रकचालक संपावर गेले आहेत. केंद्र सरकारने केलेला कायदा हा ट्रकचालकांसाठी नसून तो मोटारसायकलचालकांसाठीसुद्धा आहे. संपूर्ण वाहनचालकांसाठी हा काळा कायदा केला गेला आहे. वाहनचालकांच्या संपामुळे सर्वसामान्यांवर याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. देशात याच पद्धतीचा उद्रेक निर्माण करणं, लोकांमध्ये असंतोष निर्माण करणं, ही तानाशाही आहे,' अशी जोरदार टीका पटोलेंनी सरकारवर केली.

(Edited By Ganesh Thombare)

Nana Patole and Prakash Ambedkar
Buldhana LokSabha Constituency : शेतकऱ्यांना आधार वाटणारा युवा चेहरा ः रविकांत तुपकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com