Vidhansabha Election Voting : मतदानाच्या दिवशीच उमेदवार अन् मतदाराचा मृत्यू ; तर अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटका!

Maharashtra Assembly Election Voting Update: महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव एकीकडे साजरा होत असताना, दुसरीकडे काही घटनांमुळे याला गालबोट लागले आहे.
Assembly Election Voting
Assembly Election VotingSarkarnama
Published on
Updated on

Death of candidate and voter on polling day : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघात मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली असून, संध्याकाळी सहा वाजपेर्यंत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव एकीकडे साजरा होत असताना, दुसरीकडे काही घटनांमुळे याला गालबोट लागले आहे.

यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटनांचा समावेश तर आहेच. उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यानंतर आता एका मतदाराचाही मतदानाचा हक्क बजावताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय एका अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटकाही आला आहे.

सातारा(Satara) जिल्ह्यात खंडाळामधील मोरवे गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. या ठिकाणी शाम धायगुडे(वय-67) या मतदाराचा मतदान करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर बीड जिल्ह्यातही अशीच घटना घडली असून या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Assembly Election Voting
Parli Constituency : ‘हाय व्होल्टेज’ लढत असलेल्या परळीत मतदान केंद्राध्यक्षांना हृदयविकाराचा झटका

बीड शहरामधील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर ही घटना घडली. त्यांना सुरुवातीस चक्कर आली आणि ते खाली कोसळले मात्र नंतर रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाले.राज्यात हाय व्होल्टेज लढत असलेल्या परळी(Parali) विधानसभा मतदारसंघात सकाळपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. बोगस मतदानासाह, मारहाणीचे प्रकार मतदारसंघात घडले आहेत.

Assembly Election Voting
Beed Constituency Video : मोठी बातमी! मतदान केंद्रावरच उमेदवाराचा मृत्यू

दरम्यान, परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या केंद्रावर राखीव असलेल्या केंद्राध्यक्षांना ती जबाबदारी देण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com