Polling Station: बीड मतदानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे. मात्र, या मतदान सुरू असतानाचा मतदानकेंद्रावर उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
बाळासाहेब शिंदे असे मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर ते थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले.
शिंदे यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परळी विधानसभा मतदारसंघातील परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
बीडमधील केज विधानसभा मतदारसंघात विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त वाढवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.