Kolhapur Riot Video : मोठी बातमी! कोल्हापुरात दंगल; वाहनांची जाळपोळ, सात पोलिस जखमी, मध्यरात्री दोन गट रस्त्यावर

Kolhapur Violence : कोल्हापूरमध्ये शनिवारी रात्री दोन गट समोरासमोर आले. गाड्या पेटवण्यात आल्या तसेच दगडफेक करून पोलिसांना देखील जखमी करण्यात आले.
Kolhapur Riot
Kolhapur Riot sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शहरातील सिद्धार्थनगर कमानीसमोर लावलेला फलक व झेंड्यावरून दोन गटांत शनिवारी रात्री तुफान राडा झाला. दोन्ही गट हत्यारांसह एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत सात पोलिस जखमी झाले. प्रचंड गोंधळ, आरडाओरडा आणि त्‍यातच वीज खंडित झाल्याने गदारोळ उडाला. या चौकातील झेंडा फाडल्‍याच्‍या अफवेने या गोंधळात आणखी भर पडली. लक्ष्मीपुरी पोलिसांचा अपुरा पोलिस फाटा दोन्ही जमावांमध्ये अडकला. तीन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, सिद्धार्थनगर कमानीजवळ शुक्रवारी (ता. २२) दुपारी एका मंडळाने वर्धापन दिनाचा फलक उभा केला होता. त्याठिकाणी ध्वनिक्षेपक जोडण्यासह विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती. याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे त्याठिकाणी आले, ‘बाजूलाच सर्किट बेंच असल्याने कोणत्याही प्रकारची ध्वनियंत्रणा लावता येणार नाही, त्याला आम्ही परवानगी देणार नाही’, असे सांगून ते काम बंद पाडले. सिस्टीमचे साहित्यही ताब्यात घेतले.

पोलिसांनी समज देऊनही संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेला मोठा फलक सिद्धार्थनगर कमानीजवळ उभा केला. ध्वनिक्षेपक लावून त्यासमोर नाचण्याचा काहींनी प्रकार सुरू केला. त्याचबरोबर समोरील एका खांबावरील फलकाला हार घालून दुसऱ्या गटाला चितावणी देण्याचा प्रकार करण्यात आला. यामुळे सिद्धार्थनगर परिसरातील तरुण गटागटाने एकत्र येऊ लागले, तशी परिस्थिती बिघडू लागली.

तरुणांच्या दोन्ही गटांकडून रात्री साडेनऊच्या सुमारास एकमेकांवर थेट दगडफेक करण्यास सुरुवात झाली. सीपीआर चौकाकडून छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारी अनेक वाहने भर चौकात सुरू असलेला प्रकार पाहून जागेवरच थांबली. जमाव हातात काठ्या, शस्त्रे घेऊन एकमेकांच्या दिशेने सरसावल्याने पादचाऱ्यांसह, वाहनधारकांचा थरकाप उडाला. मिळेल त्या दिशेने त्यांनी पळ काढला. जमावाने सिद्धार्थनगर कमान राजेबागस्वार दर्गा परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केली.

Kolhapur Riot
Nagpur Corporation: नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत मोठी अपडेट; इच्छुक नगरसेवकांची प्रतीक्षा संपणार

पोलिस रात्रभर रस्त्यावर

कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा फौजफाटा या जमावासमोर अत्यंत अपुरा पडला. पोलिस निरीक्षकांसह अनेक अंमलदार विना हेल्मेट धाडसाने जमावावर चालून गेले. झाडाच्या फांद्या, काठ्या अशा अपुऱ्या साहित्यासह पोलिस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच जमावाने टेम्पो उलटवून पेटवून दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आसपासच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याठिकाणी उभ्या असलेल्या पाच मोटारींसह, एक रिक्षाची जमावाने तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, गृह पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.

पोलिस जखमी

दगडफेकीत पाच जण जखमी झालेत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे अंमलदार आबिद मुल्ला जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. रात्री उशिरा आणखी जखमी उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू होते.

Kolhapur Riot
PMC Ward: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये पेटणार शीतयुद्ध? काय आहे नेमकं कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com