Shobha Fadnavis : भांडू नका, मोठेपणासाठी रडू नका ; मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी भरसभेत सुधीर मुनगंटीवारांचे टोचले कान

Maharashtra BJP politics : हे बोलत असताना त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता हे जरी त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी हा टोला भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Shobha Fadnavis
Shobha Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यभरात काल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला. पण स्थापना दिनीच पक्षातील अंतर्गत गटबाजीचेही दर्शन झाले. भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता चांगलेच कान टोचले.

चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला ते हजर राहिले नाहीत. जोरगेवार यांनी भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम कन्यका सभागृहात आयोजित केला होता. आमदार जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

याचवेळी शोभा फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता भर कार्यक्रमात कानपिचक्या दिल्या. त्या म्हणाल्या, जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका" अशा शब्दात शोभा फडणवीस यांनी खडे बोल सुनावले आहे.

मात्र हे बोलत असताना त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता हे जरी त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी हा टोला भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Shobha Fadnavis
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विरोधात सुनावणी कधी? सरन्यायाधीशांनी सिब्बलांना करुन दिली न्यायव्यवस्थेची आठवण

दरम्यान एकाच शहरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आणि एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ लक्षात घेता चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. अशातच पक्षातील या गटबाजीवर शोभा फडणवीस यांनी बोट ठेवत जाहीरपणे आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे.

Shobha Fadnavis
Girish Mahajan : कमरेच्या खाली वार केल्याशिवाय.., गिरीश महाजन खडसेंवर संतापले

दरम्यान चंद्रपूर शहरात भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यामुळे मोठे कार्यक्रम घेता येत नसल्याची खंत किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे. ही खंत व्यक्त करतानाच त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा भाजप कार्यालयासाठी दान करणार असल्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com