Video Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, 'दोन वर्षात एक लाख...'

Devendra Fadnavis MPSC : वर्ग 'क'ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येतील. मागील दोन वर्षात महायुतीच्या सरकारने एक लाख 8 हजार नोकऱ्या सरकारने पारदर्शक पद्धतीने दिल्याचे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात गैरप्रकार होऊ नये म्हणून सरकार नवीन कायदा करत आहे. याच अधिवेशनात कायदा होणार आहे. तसेच वर्ग 'क'ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच मागील दोन वर्षात महायुतीच्या सरकारने एक लाख 8 हजार नोकऱ्या सरकारने पारदर्शक पद्धतीने दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, वर्ग कची भरती ही एमपीएससीच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी होती. त्याचा निर्णय मागील कॅबिनेटमध्ये आम्ही घेतला आहे. टप्याटप्याने त्याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कायदा करणार आहोत. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांशी आमची चर्चा झाली आहे.

Devendra Fadnavis
Vidhan Sabha Monsoon Session Live: पेपरफुटीवरुन विरोधक-सत्ताधारी यांच्यात खडाजंगी; अधिवेशनात कायदा आणणार का?

मोदी, शाहांचे आभार

आजपासून (सोमवार) भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. ब्रिटीशांनी केलेले कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी केले होते. पण भारतीय संसदेच्या कायदे केल आणि ते आजपासून लागू झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

'राष्ट्रवादी'चा मंत्री भाजपात येणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले. तसेच ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच 'सामना'तून करण्यात आलेल्या टीकेला मी कोणालाही उत्तर देवू का? आमचा स्तर बघा, असे म्हणत ठाकरे गटाला डिवचले.

Devendra Fadnavis
Anil Patil Vs Satish Patil : सतीश पाटलांचे वाभाडे काढताना अनिल पाटलांनी पुतण्याचा पराभव ते एरंडोलमधील मतदान सर्वच काढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com