Anil Patil Vs Satish Patil : सतीश पाटलांचे वाभाडे काढताना अनिल पाटलांनी पुतण्याचा पराभव ते एरंडोलमधील मतदान सर्वच काढलं

Jalgaon NCP Leader : माजी मंत्री सतीश पाटील यांच्या सख्ख्या पुतण्याचा जळगाव लोकसभा मतदारसंघातून दारूण पराभव झाला. तसेच, पाटील ज्या एरंडोलमधून विधानसभा लढवतात. त्या मतदारसंघातून त्यांचे पुतणे पिछाडीवर आहेत.
Anil Patil -Satish Patil
Anil Patil -Satish PatilSarkarnama

Mumbai, 01 July : माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा ही राजकीय वैफल्यातून करण्यात येत आहे. ज्या माजी मंत्री सतीश पाटील यांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सख्ख्या पुतण्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच, पाटील यांच्या मतदारसंघातच ते मोठ्या पिछाडीवर राहिले आहेत, त्यामुळे सतीश पाटील यांच्याकडून अशी वैफल्यातून विधाने केली जात आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे काही आमदार हे जयंत पाटील (Jayant Patil) यांना भेटल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर अनिल पाटील यांची केंद्रीय नेत्यासोबतची भेट चर्चेचा विषय ठरला होता. तसेच, जळगावमधील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनीही अजितदादांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील, असा दावा केला होता. त्यावर मंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.

मंत्री पाटील म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशाचे विधान हे वैफल्यातून करण्यात आलेले आहे. माजी मंत्री सतीश पाटील यांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला, त्यांच्या सख्ख्या पुतण्याचा लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघातून दारूण पराभव झाला. तसेच, सतीश पाटील ज्या एरंडोल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतात. त्या मतदारसंघातून त्यांचे पुतणे मोठ्या मताधिक्यांनी पिछाडीवर आहेत. म्हणून वैफल्यातून सतीश पाटील यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत.

आमच्यासोबत जे आमदार आहेत, त्यांनी विकासाचा दृष्टीकोन ठेवूनच अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय त्या वेळी घेतला होता. आज या आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. हे सर्व आमदार कालही आमच्यासोबत होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत, असा दावा अनिल पाटील यांनी केला.

Anil Patil -Satish Patil
Bidri Sugar factory Action : बिद्रीचं नाव अन्‌ विधानसभेचा डाव; राधानगरीत के. पी. पाटलांनी संधी साधली!

मंत्री पाटील म्हणाले, आमचे 15 ते 20 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा रोहित पवार गेल्या महिनाभरापासून करत आहेत. विधान परिषदेच्या ११ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ बघायला मिळेल. आमचे आमदार त्यांच्या संपर्कात असतील, तर त्याचा परिणाम आतापर्यंत दिसला असता किंवा दिसेल. पण, रोहित पवार यांच्याकडून केवळ दोन महिन्यांवर असलेली विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे दावे केले जात आहेत. हे सर्व दावे खोटे आहेत. आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी आणि महायुतीबरोबर तुम्हाला बघायला मिळतील.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आमच्या तीनही पक्षाचे नेते वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करतील. यात कोणताही वाद नाही. पण, ज्यांचं पक्षीय बलाबल चांगलं असतं. त्यांच्याच पारड्यात ही निवडणूक पडत असते. त्या दृष्टीनेही आमची पाऊलंही उचलली जात आहेत, असे सूचक विधानही पाटील यांनी केले.

Anil Patil -Satish Patil
Ram Satpute : ‘सोलापूर शहर मध्य’ची ऑफर राम सातपुतेंनी नाकारली; माळशिरसमधून विधानसभा लढण्याचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com