Maharashtra Assembly Session: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात,विरोधक आक्रमक; फडणवीसांनी सुनावलं,म्हणाले...

Devendra Fadnavis News : राजकारण करु नका, शेतकऱ्यांचा विषय...
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षांनी सभागृहात केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती दिली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं सांगतानाच फडणवीसांनी विरोधकांना खडेबोल सुनावलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवसाच्या कामकाजाला बुधवारी (दि.८) सुरुवात झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह, छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी अवकाळी पावसाच्या फटका बसलेल्या शेतकर्यांवरुन आक्रमक पवित्रा घेत सरकारी मदतीची मागणी सभागृहात केली. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाबाबत अजित पवारांकडून स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar News: धंगेकरांनी घेतली पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची भेट; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाही भेटणार...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या मागणीला प्रत्युत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणाले,अवकाळी पावसामुळं राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तात्काळ नुकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

राजकारण करु नका, शेतकऱ्यांचा विषय

दरम्यान, नकसानीबाबत देवेंद्र फडणवीस माहिती सांगतना विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहयला मिळालं. तत्काळ शेतकऱ्यांनी मदत करा अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, राजकारण करु नका, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis
Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महिला दिनाला खास फेसबुक पोस्ट; केलं 'हे' आवाहन

यावेळी फडणवीसांनी राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागाची माहिती दिली. यात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात या भागात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यामध्ये गहू, भाजीपाला, आंबा पिकांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात 3 हजार 144 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com