Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा विक्रम मोडला; सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे तिसरे नेते!

Devendra Fadnavis Breaks Sharad Pawar Record : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदी सर्वाधिक काळ राहण्याच्या विक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नवीन विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर झाला आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांमध्ये फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा विक्रम मोडला.

शरद पवार यांनी तब्बल चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले. ते २ हजार ४१२ दिवस मुख्यमंत्रि‍पदावर होते. तर, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवत असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे २ हजार ४३० दिवस पूर्ण करत शरद पवारांचा विक्रम मोडला.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. ते सर्वाधिक ४ हजार ०९६ दिवस मुख्यमंत्री होते. तर, त्यांच्यानंतर विलासराव देशमुख २ हजार ६८६ दिवस मुख्यमंत्रि होते. ते दुसऱ्या स्थानी आहेत.

सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री

जुलै १९७८ मध्ये शरद पवार हे पहिल्यांदा वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते.चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांचा एकदाही पूर्ण झाला नाही. तर, देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. सर्वात कमी कालावधीमध्ये मुख्यमंत्रि‍पदी राहण्याचा नकोसा विक्रमही फडणवीस यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये फक्त ८० तास मुख्यमंत्रि‍पदी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis
Sharad Pawar
Devendra Fadnavis
sharad pawar | devendra fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com