Devendra Fadnavis alert : मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला केले सतर्क; 2014-15 सारखी टंचाई निर्माण होण्याची भीती, धरणांमधील पाणीसाठा किती?

Maharashtra water crisis, El Niño India impact : एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यादृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Maharashtra Dam
Maharashtra DamSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government alert : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. असे झाल्यास राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यापार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर चर्चा करण्यात आली.  

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा,असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12 टक्के तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी तर याच दिवशी 2015 ला 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसी आहे.

Maharashtra Dam
West Bengal election news : मतदानाच्या काही तास आधीच ममतादीदींना मोठा धक्का; भाजपने विद्यमान आमदारालाच फोडले...

मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी,असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यादृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील महसूल विभागनिहाय पाणीसाठा (कंसात धरणसंख्या) : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) या क्रमाने -

 नागपूर : (387) 80.79, 63.40

अमरावती : (276) 73.72, 65.13

छत्रपती संभाजीनगर : (929) 129.37, 97.09

नाशिक : (539) 101.96, 89.28

पुणे : (724) 206.55, 174.04

कोकण : (173) 61.24, 62.92

एकूण : (3028) 653.63, 551.86

Maharashtra Dam
Maharashtra E-challan news : ई-चलन वसुलीतील पोलिसांच्या गैरप्रकारांवर सरकार घालणार मोठा घाव; थेट गृह विभागातून निघाला आदेश...

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) या क्रमाने -

कोयना : 33.62, 36.76

जायकवाडी : 42.03, 34.44

उजनी : 13.39, (0)

पेंच प्रकल्प समूह : 26.57, 26.35

इसापूर : 21.45, 17.82

भातसा : 15.70, 14.91

गोसीखुर्द : 14.31, 5.93

खडकवासला धरण समूह : 11.32, 9.82

मुळा : 9.54, 10.53

अप्पर वर्धा : 10.21, 9.53

अप्पर वैतरणा : 6.52, 5.95

भंडारदरा : 5.25, 6.04

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com