Free School Bag Scheme : फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय! पालकांचा खर्चही होणार कमी, विद्यार्थ्यांसाठी शासन आदेश जारी

Maharashtra Government Free School Bags Scheme : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळेत नियमित उपस्थिती वाढवणे, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Free School Bag Scheme
Free School Bag Schemesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. या योजनेचा उद्देश पालकांचा आर्थिक भार कमी करणे आणि विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढवणे हा आहे.

  3. मुंबईसारख्या काही महापालिकांच्या शाळांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Pune News : राज्यातील शाळेतील विद्यार्थी गळतीचा मुद्दा सध्या मोठ्या चिंतेचा विषय बनला असून विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवणे, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मोफत शालेय दप्तर योजना आणली असून शुक्रवारी (ता.१३) हा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेनंतर्गत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर दिले जाणार आहे. दरम्यान या योजनेतून मुंबई सारख्या ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये याआधीपासूनच मोफत दप्तराची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना वगळण्यात आले आहे.

मोफत शालेय दप्तर योजनेचा मुख्य उद्देश हा पालकांचा शैक्षणिक खर्चाचा भार कमी करणे, शाळेत नियमित उपस्थिती वाढवण्यासह ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आहे.

Free School Bag Scheme
Free School Bag : पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना आता दप्तरही मिळणार; सरकारकडून १६५ कोटींची तरतूद

त्याप्रमाणे आता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, दोन गणवेश, मध्यान्ह भोजन योजना, शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता यात मोफत दप्तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकारच्या या मोफत शालेय दप्तर योजनेत राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वीचे सर्व पात्र विद्यार्थ्यांना ग्राह्य धरले असून या सर्वांना लाभ दिला जाणार आहे. पण ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिकांमध्ये ही योजना सुरू आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासनाने सुमारे १६५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर हा निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरित केला जाणार आहे.

वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार वितरित निधीचा उपयोग निश्चित उद्देशासाठीच करण्यात यावा असे बजावले आहे. तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला या योजनेची उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे बंधनकारक राहील. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असून त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोफत दप्तर उपलब्ध झाल्याने शाळेतील गळती थांबण्यास मदत होणार आहे.

Free School Bag Scheme
School fee news : लाखभर रुपये फी घेणाऱ्या शाळांसाठी यंदाची ‘सरकारी फी’ ठरली; शासन आदेश जारी

FAQs :

1. मोफत दप्तर योजना कोणासाठी लागू आहे?
इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.

2. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
पालकांचा शैक्षणिक खर्च कमी करणे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

3. कोणत्या शाळा या योजनेतून वगळल्या आहेत?
ज्या महापालिकांच्या शाळांमध्ये आधीपासूनच मोफत दप्तर दिले जाते, त्या शाळा वगळण्यात आल्या आहेत.

4. हा निर्णय कोणत्या विभागाने जाहीर केला?
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

5. ही योजना कधीपासून लागू होणार आहे?
शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com