Devendra Fadnavis Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत कोणाला स्थान?

Mahayuti Government Oath Ceremony in Azad Maidan : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना देखील शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले होते.
 Devendra Fadnavis Oath Ceremony
Devendra Fadnavis Oath Ceremony sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra CM News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तब्बल 40 नागरिक या शपथविधीसाठी आझादा मैदानावर उपस्थित राहणार आहेत. लाडक्या बहि‍णींना या शपथविधीचे खास निमंत्रण देण्यात आले आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी व्हीआयपी,व्हीव्हीआपी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शपथविधी सोहळ्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत कोण बसणार याची उत्सुकता होती.

पहिल्या रांगेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कुटुंबीय, अंबानी यांचे कुटुंबीय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, निलम गोऱ्हे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक हे असणार आहेत. तर, दुसऱ्या रांगेत कुमार बिर्ला, मर्चंट कुंटुंबीय, शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, न उदय कोटक, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर असणार आहेत.

 Devendra Fadnavis Oath Ceremony
Imtiaz Jaleel : फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, त्यांनी आता महाराष्ट्राच्या हिताचे काम करावे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,राज ठाकरे यांना देखील शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले होते.

शरद पवार आणि सुप्रिय सुळे यांनी लोकसभेचे अधिवेश असल्याने उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. तर, नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. राज ठाकरेंनी वैयक्तिक करणामुळे उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही यावर सस्पेन्स होता. मात्र, आज शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, असे जाहीर केले. तसेच याबाबतचे पत्र सामंत यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले आहे.

 Devendra Fadnavis Oath Ceremony
Imtiaz Jaleel : फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, त्यांनी आता महाराष्ट्राच्या हिताचे काम करावे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com