Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा तिसऱ्यांदा अर्ज नाकारला, परवानगीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले, 'मेरिटप्रमाणे पोलीस'

Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा १८ वा दिवस असून हे त्यांचे 11 वे उपोषण सुरू आहे.
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis On Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला सुरूवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस आहे. पण सरकार सकारात्मक दिसत नसल्याने त्यांनी मुंबईकडे निघण्याचा निर्णय घेतला असून ते रवाना झाले आहेत. दरम्यान सरकारने जरांगे पाटलांच्या 12 मागण्या मान्य केल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांच्या परवानगी अर्जावर देखील भाष्य केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आता त्यांनी अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळ सोडून मुंबईकडे कूच केले आहे. ते काही मोजक्याच सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान त्यांनी मुंबईत उपोषण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते. पण ते पोलिसांनी फेटाळलेत. आता पुन्हा एखदा त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी मागणी अर्ज केला आहे. पण त्यांना पोलिस परवानगी देतील अशी शक्यता सध्या तरी नाही.

दरम्यान आता मुंबई पोलिसांच्या या परवानगीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी असून तेच या संदर्भातील निर्णय घेतात. जरांगे यांच्याकडून अर्ज आला होता. पण तो मुंबई पोलिसांनी नाकारला आहे. आता पुन्हा त्यांनी परवानगीसाठी अर्ज दिला आहे. मात्र पोलीस त्यावर मेरिटप्रमाणे कार्यवाही करतील.

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : जरांगेंना सरकारने तिसऱ्यांदा परवानगी नाकारली; तरीही मुंबईकडे रवाना : ‘मरण आलं तरी चालेल, मी जाणारच’ म्हणत ठाम निर्धार

मुंबईसह पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे हा सार्वजनिक मोठा असा उत्सव असतो. हिंदू सणांमधला सर्वात मोठा सण म्हणून सार्वजनिक रित्या तो साजरा केला जातो. यामुळे या उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.

याचबरोबर मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया देताना, आंदोलने होत असतात, याआधीही त्यांनी अशी आंदोलनं केली आहेत, यापुढेही ते करू शकतात. उलट यावेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. ज्या मागण्या कायदेशीर होत्या, त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. जरांगेंनी एकूण १३ मागण्या केल्या होत्या. त्यापैकी १२ मागण्या मान्य केल्या.

जी मागणी मान्य होऊ शकत नाही, कायद्याची अडचण काय आहे, न्यायालयात केस काय आहे याची सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे. राज्याचे एजी यांचे नेमकं काय म्हणणं आहे हे देखील त्यांना सांगण्यात आलं आहे. तर आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर समाजाचे कसे नुकसान होईल हे देखील त्यांना सांगितलं आहे.

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांकडून मराठा समाजाचा मोर्चा स्थगित, एकटेच मुंबईला जाणार

यामुळे आता शा पद्धतीने भूमिका न घेता आता सणासुदीच्या दिवसांमध्ये लोकांना कोणताही त्रास होणार नाही, असा निर्णय त्यांनी घेणं अपेक्षित होतं असे त्यांना वाटतं असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान फडणवीस यांनी आपली सरकारची भूमिका मांडली असून आता यावर मनोज जरांगे पाटील कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com