"फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी महामंडळांच्या अध्यक्षपदी बसवले

बनावट नोटांचा हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोटबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते. त्याचे कारण बनावट नोटांचा हा सगळा खेळ फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा. तसेच बनावट नोटांशी संबंधित प्रकरणे फडणवीसांनी समीर वानखेडेंच्या मदतीने दाबली असे अनेक आरोप करत महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे.

काल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी केली असून त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर मलिकांनी हे आरोप फेटाळत हा बाँम्ब फुसका असल्याचे सांगत आपण हायड्रोजन बाँम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज हा हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे.

Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
हायड्रोजन बाँम्ब : मुख्यमंत्री काळात फडणवीसांचा खोट्या नोटांच्या रॅकेटना आशीर्वाद

नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस जो मूळ मुद्दा आहे तो भटकवण्याचा आणि समीर वानखेडे यांना वाचवण्याचे काम करत आहेत. एखादा माणूस २००८ मध्ये नोकरीत येतो आणि १४ वर्षापासून मुंबई शहर सोडत नाही, त्याचे कारण फडणवीस आणि वानखेडेंचे जुने संबंध आहेत. फडणवीस इतरांवर आरोप करतात की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे, पण फडणवीसांना विचारु इच्छितो की गुन्हेगार लोक आहेत त्यांना सरकारी महामंडळांचे अध्यक्ष का बनवले?

Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
मलिकांनी सांगितलं, `समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच असंही कनेक्शन!`

नवाब मलिक यांनी फडणवीसांवर नागपूरचा गुंड मुन्ना यादव याच्याशी संबंध असल्याचे आरोप करत त्याला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? हैदर आजम याला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? असा सवाल केला आहे. तसेच गुन्हेगारांना राजकारणात आणून त्यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हैदर आजम हा बांगलादेशातील लोकांना मुंबईत आणून स्थायिक करण्याचे काम करत नाही का? आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलिसांनी चौकशी सुरु केली. बंगाल पोलिसांनी तिची कागदपत्र बनावट असल्याचे सांगितल्यानंतर मालाड पोलिसांनी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com