Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी(ता.29)ऑक्टोबर रोजी मोठी घडामोड पाहायला मिळाली. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एरवी प्रचारसभा गाजवणारे आणि आपल्या वक्तृत्वावर मजबूत पकड असलेले राज्यातील देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आणि त्या तिघांचीही तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना कोपरखळी मारली.
राज्याचं राजकारण तापलं असतानाच मुंबईत महाराष्ट्राची हास्यरेषा या पुस्तक प्रकाशन सोहळा रंगला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन नेते एकत्र आल्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमातील भाषणात म्हणाले,ज्याला ज्याच्यात गती त्याने आपल्या क्षेत्रात उत्तम काम केले पाहिजे.मला राजकारणच चांगलं समजतं, म्हणून मी राजकारणातच काम करतो. आता राज ठाकरे इतके चांगले व्यंगचित्रकार, उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत. त्यामुळं यांनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना लगावला. यावेळी त्यांनी हा गंमतीचा भाग सोडला, तर राज आणि उद्धव यांच्यासह मला या कार्यक्रमाला बोलावलं याचा अतिशय आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं.
या कार्यक्रमाला आम्ही तीन नेते एकत्र आल्यावर लोकांनाच आश्चर्य वाटत होतं की,पण कार्यक्रमाला जावं की न जावं असा साधा विचारही माझ्या मनात आला नाही. तसेच या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचंही मला आश्चर्य वाटले नाही.कारण आम्ही एका मंचावर आलो आहोत. कारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे.हेच धागे आहेत की, राजकारणात जो संवाद आहे तो पाहायला मिळतो,अशी भावनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही विशेष आभार मानले.ते म्हणाले, त्यांच्यामुळेच मला या कार्यक्रमात येता आलं.कारण तुम्ही सुचवलं की, या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं.पण आपल्याकडे सुदैवानं आजही राजकारणातील संवाद पाहायला मिळतो. नाहीतर,दक्षिणेत खून के प्यासे असे चित्र दिसते.मात्र आम्ही कार्यक्रमाला एकत्र येऊ शकतो, चहा पण पिऊ शकतो असंही फडणवीसांनी सांगितलं.
याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी फोन केला की, मुख्यमंत्री येतात असे आशिष शेलार म्हणाल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, पण आशिषजी 2019 पर्यंत उद्वजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला, तेव्हा तेव्हा मी आलो. पण 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असं म्हटलं. या त्यांच्या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला. मी वाटच पाहत राहिलो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात शेवटचे भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत .आज मी काहीही बोललो, तरी आजच्या दिवस ते प्रतिषटकार लगावणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.