

New Delhi News: निवडणूक आयोगाकडे आर्थिक वर्ष 2025-26 साठी सादर करण्यात आलेल्या अहवालांमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अहवालात महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांना या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीविषयीची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुमारे 139-52 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला सुमारे 1.25 कोटी आणि राज ठाकरेंच्या मनसेला सुमारे 1.50 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं समोर आलं आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरेंची मनसे या तीनही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या फॉर्म-24A अंतर्गत दिलेल्या आकडेवारीतून आर्थिक वर्षातील मिळालेल्या निधीबाबतची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार,एकनाथ शिंदेंच्या पक्षाला उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा सुमारे 112 पट, तर राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा सुमारे 93 पट अधिक निधी मिळाला आहे. परंतू, ठाकरे बंधूंच्या पक्षांना मिळालेल्या निधीची एकत्रित रक्कम सुमारे 2.75 कोटी रुपये होते. या तुलनेत शिंदे यांच्या शिवसेनेला दोन्ही पक्षांच्या एकूण निधीपेक्षा सुमारे 51 पट अधिक रक्कम मिळाली आहे.
राष्ट्रीय व प्रादेशिक प्रमुख राजकीय पक्षांना साधारणपणे 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जाणाऱ्या फॉर्म-24 ए च्या अहवालात दिली जाते. या फॉर्ममधील माहितीनुसार, आता दोन्ही शिवसेना आणि मनसेबाबतच्या निधीविषयीची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तीन कंपन्यांनी सर्वात मोठ्या देणग्या दिल्याचं समोर येत आहे. या तीन देणग्यांची एकूण रक्कम 75 रुपये कोटी इतकी रुपये आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या सुमारे 139.92 कोटी रुपयांच्या एकूण घोषित देणग्यांपैकी जवळपास 53.06 टक्के रक्कम या तीन देणग्यांमधून आली आहे. उर्वरित रकमेमध्ये इतर कंपन्या आणि देणगीदारांचा उल्लेख केला आहे.
शिवसेना पक्षानं निवडणूक आयोगात सादर केलेल्या अहवालात HOABL मॅनेजमेंट, एसबी इन्फोकॅश आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित इतर कंपन्यांची नावांचाही समावेश आहे. या सर्व देणग्या चेक, डिमांड ड्राफ्ट आणि RTGS यांसारख्या माध्यमांनी वापर करण्यात आल्याचा उल्लेख अहवालात म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाला सुमारे 1.25 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. पक्षाने सादर केलेल्या तपशिलात जुनिपर हॉटेल्स (ग्रँड हयात), अजिमा मॅनर प्रायव्हेट लिमिटेड आणि म्युच्युअल ग्रोथ फंड यांसारख्या नावांचा समावेश आहे.
दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 1 कोटी 49 लाख 81 हजार रुपये, म्हणजेच सुमारे 1.50 कोटी रुपयांच्या देणग्या जाहीर केल्या आहेत. मनसेला सारस्वत कन्स्ट्रक्शन, पायोनियर हाउसिंग तसेच स्थानिक संस्था आणि समर्थकांकडून मिळालेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.