Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : ठाकरे सरकारची एकाधिकारशाही मोडून काढली; फडणवीसांनी फोडला 'बॉम्ब'

Devendra Fadnavis big claim regarding Dharavi redevelopment project : उद्धव ठाकरे सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकाधिकारशाही आम्ही रोखल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा आणि त्यातील अडथळेंवर भाष्य करत उद्धव ठाकरेंना डिवचले. धारावीच्या पुनर्विकासासाठी नेमलेल्या कंपन्यांमध्ये राज्य सरकारचा देखील हिस्सा आहे.

या निविदांसाठी अटी-शर्ती उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या. यातून विकासकाची विकास हक्क हस्तांतरण एकाधिकारशाही (टीडीआर मोनोपोली) निर्माण होण्याचा धोका होता. ही एकाधिकारशाही रोखली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात धारावी पुनर्वसन प्रकल्पावर मोठं भाष्य केले. या प्रकल्पात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारची, कशी एकाधिकारशाही सुरू झाली होती आणि ती कशी रोखली, यावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेविरुद्ध फडणवीस, असा 'सामना' रंगण्याची चिन्हं आहेत. फडणवीस यांचा ठाकरे सरकारच्या एकाधिकारशाहीचा दाव्याला ठाकरेंकडून कसे उत्तर मिळते, हे देखील पाहिले जाणार आहे.

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वाॅरंट..

देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्वसनाची संकल्पना कोणाची होती, हे सांगताना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण झाली. राजीव गांधी यांनीच धारावी पुनर्वसनाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर 20-25 वर्षे काहीच झाले नाही, फक्त चर्चा व्हायच्या. चर्चांना कृती आणि आकार येत नव्हता. भाजप (BJP) सत्तेत आल्यावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आले. केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी आणि मदत मिळवण्यात आली. या भागात रेल्वे जमीन पुनर्वसनासाठी मिळविताना सुमारे पावणेदोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray
Manoj Jarange News: जरांगे पाटलांंचा 'मास्टर प्लॅन' ठरला; बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करणार?

यासाठी मागवलेल्या प्रस्तावात तिघांचे प्रस्ताव आले. यात अदानींना हे काम मिळाले. मात्र या पुनर्विकास कंपनीत राज्य सरकारचा हिस्सा आहे. या निविदांसाठीच्या अर्टी-शर्ती उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या. यात एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका होता. विकासकाची विकास हक्क हस्तांतरण निर्माण होण्याचा धोका होता. त्यात आम्ही बदल करून मर्यादा घातल्या. आमच्या सरकारने ही एकाधिकारशाही रोखली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पारदर्शी पद्धतीने डिजिटलपद्धतीने विकासकांना उपलब्ध विकास हक्क हस्तांतरण याची माहिती दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com