Manoj Jarange News: जरांगे पाटलांंचा 'मास्टर प्लॅन' ठरला; बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करणार?

Political News : जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत घोंगडी बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांच्या निमंत्रणासाठी मराठा सेवक गावोगाव पिंजून काढत असून या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे महिलांचीही उपस्थिती लक्षणीय दिसत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर भर दिला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्वच सहाही मतदारसंघांत घोंगडी बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांच्या निमंत्रणासाठी मराठा सेवक गावोगाव पिंजून काढत असून या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे महिलांचीही उपस्थिती लक्षणीय दिसत आहे. (Manoj Jarange News)आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता जरांगे पाटलांचा मास्टर प्लॅन ठरला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुकारलेल्या आंदोलनाला एक वर्ष होत आहे. उपोषण, संवाद बैठका, जिल्ह्यांचे दौरा, शांतता फेऱ्या असा वर्षभरापासून आंदोलनांचे एकेक टप्पे सुरु आहेत.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने न्यायमुर्ती शिंदे यांची समिती नेमून कुणबी नोंदी शोधल्या व या आधारे प्रमाणपत्र दिले आहेत. मात्र, नोंदींच्या अधारे सगेसोयरे कायदा लागू करुन मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत.

यासाठी त्यांनी मुंबईलाही धडक मारली. मात्र, सरकारने आश्‍वासन पाळले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. आताही आरक्षण दिले नाही तर निवडणुकीत भूमिका घेण्याबाबत ते समर्थकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी विविध मतदारसंघांतून इच्छुकांकडून अर्जही गोळा केले आहेत.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News : दादांनी दिला बहिणींना पाच वर्षांचा वादा

दरम्यान, निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत ते आता जिल्ह्यातील बीड, केज, परळी, आष्टी, माजलगाव व गेवराई मतदारसंघांत घोंगडी बैठका घेणार आहेत. 5 सप्टेंबरला त्यांची जिल्ह्यातील पहिली घोंगडे बैठक गेवराई मतदारसंघात होणार आहे. तर, शेवटची बैठक 13 सप्टेंबरला आष्टी मतदारसंघात होणार आहे. बैठकांच्या तयारीसाठी मराठा सेवक सरसावले आहेत. मतदारसंघ व तालुकानिहाय दौरे काढले जात आहेत. याला पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद पहायला मिळत आहे.

बैठकांना महिलांचीही मोठी उपस्थिती

मराठा सेवकांनी शनिवारी वासनवाडी, खापरपांगरी, उमरद जहांगिर, तांदळवाडी, केतूरा, अवलपूर, पारगाव, बहादरपूर, सोनगाव, साक्षाळपिंप्री, नारायणगड, बेलूरा, काटवटवाडी, औरंगपूर, राजुरी न., तिप्पटवाडी, मुर्शदपूर, रूई, पिंपरगव्हाण, काकडहिरा, तळेगाव येथे बैठक घेतली. बैठकांना महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत आहे.

घोंगडी बैठकांना गावागावातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्‍वास ग्रामस्थ देत आहेत. घोंगडी बैठकांची जय्यत तयारी सुरू असून कोणतीही गैरसोय होणार नाही, याची बारकाईने काळजी घेतली जात आहे.

Manoj Jarange Patil
Dharashiv Assembly Election : धाराशिवमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला कोण बाजी मारणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com