Fadnavis Government: फडणवीसांच्या टीममध्ये लवकरच दिल्ली गाजवलेल्या 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याची एन्ट्री; निवडणुकीच्या धामधुमीतच मोठा बदल

Maharashtra News: राजेश कुमार मीना यांची 30 जून 2025 रोज महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते आता 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त आहे. त्यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार राजेश अगरवाल यांच्याकडे सोपवला जाणार आहे.
Devendra Fadnavis, Narendra Modi
Devendra Fadnavis, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच प्रशासनातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांचा कार्यकाळ येत्या 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल हे पदभार सांभाळणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) केडरचे राजेश अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांच्याकडे प्रशासनातला सुमारे 35 वर्षांचा प्रचंड दांडगा अनुभव आहे. ते सध्या केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अकोला,जळगावच्या जिल्हाधिकारी पदासह विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पातळीवरील विविध महत्त्वाच्याव जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत.

राजेश कुमार मीना यांची 30 जून 2025 रोज महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते आता 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त आहे. त्यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार राजेश अगरवाल यांच्याकडे सोपवला जाणार आहे.

राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी स्विकारण्यापूर्वी राजेश अगरवाल यांचा प्रशासकीय वर्तुळात प्रचंड दबदबा आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक धोरणात्मक निर्णय, आर्थिक शिस्तीसह डिजिटल प्रशासकीय कारभाराला कायमच पाठबळ देत आले आहेत. तसेच त्यांनी राज्याच्या अर्थ आणि माहिती तंत्रज्ञान विभागात घेतलेल्या ठोस निर्णयांची जोरदार चर्चा झाली होती.

Devendra Fadnavis, Narendra Modi
मोठी बातमी : 14 जिल्हा परिषदांच्या आरक्षणाची पुर्नरचना होणार? सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतर निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

राजेश अगरवाल यांनी केंद्रातील त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या आधार, जनधन, डिजिलॉकर या उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. अगरवाल यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सामाजिक न्याय उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात अगरवाल यांचं मोठं योगदान आहे.

राजेश अगरवाल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९ बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी पुन्हा एकदा राज्याच्या सेवेत एन्ट्री होणार आहे. अगरवाल हे सध्या केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयातील दिव्यांग व्यक्ती विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहे. आता याच अगरवालांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत बोलावले आहेत.

Devendra Fadnavis, Narendra Modi
Bhusawal Politics: अनिल चौधरी यांचा पलटवार, संजय सावकारे मंत्री झाल्यावर भुसावळ शहरात वाढली होती गुन्हेगारी!

महाराष्ट्राचे पुढील मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल हे पुढील आठवड्यात कार्यभार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांचा कार्यकाळ नोव्हेंबर रोजी संपत असून त्यांच्या जागी अगरवाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com