

Dhairyasheel Mohite-Patil News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीची पडघम आता वाचू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना डिवचले आहे.
'माझ्याविषयी कोण काय बोलले तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ.', असा इशाराही धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.
अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
ते म्हणाले, बँकेच्या बाबतीत रणजितदादांनी पुढाकार घेतलेला आहे. ते सगळीकडे जातील, सगळ्यांशी बोलतील आणि मग दोन-तीन दिवसात काय तो निर्णय होईल. सहकार टिकवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून होईल.
सोलापूर DCC बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. 2015 झाली होती शेवटची जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ; 2018 ते 2026 पर्यंत जिल्हा बँकेवर होते प्रशासनराज. येत्या 26 ते 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेच्या निवडणूकसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.3 नोव्हेंबरला पात्र अर्जांची यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे,3 ते 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 18 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि 26 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी18 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि 26 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 19 संचालक निवडायचे आहेत.यातील 11 संचालक हे विकास सोसायट्यामधून दोन महिला,अनुसूचित जाती - जमाती,इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती - भटक्या जमाती,पणन,दूध संस्था आणि इतर बँक पथसंस्थेतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाईल .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.