Jayant Patil on NCP Merger : 'राष्ट्रवादीचे विलीनीकरण आता सुतरामही शक्यता नाही,...', जयंत पाटलांनी कंडका पाडला

NCP Merger Sharad Pawar : शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारी बाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे की शरद पवार दिल्लीमध्ये असणे महत्त्वाचे आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

NCP Merger News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलातना सांगितले की, ज्यांच्या आग्रहाने विलीनीकरणाची चर्चा सुरु होती तेच अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत. त्यामुळे आता चर्चा नाही आणि विलीनीकरण प्रश्नच उद्भवत नाही.

विलीनीकरणाची चर्चा अजितदादा पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर ही चर्चा पूर्णपणे थांबली आहे. आता विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण दोन्ही बाजूच्या भावना समजून घेणारा नेताच आपल्यात नाही तर आता इथून पुढे विलीनीकरणाची सुतरामही शक्यता नाही, असे देखील ते म्हणाले.

शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारी बाबत बोलताना ते म्हणाले, आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे की शरद पवार दिल्लीमध्ये असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पवारसाहेबांना राज्यसभेसाठी निवडून द्यावे, अशी भावना पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हीच भूमिका आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.

Jayant Patil
Rajya sabha Election : धैर्यशील पाटलांची खासदारकी 2 वर्षांचीच ठरली; तटकरेंची पॉवर अन पत्नीचा पराभव ठरला सेटबॅक

राज्यसभा उमेदवारीबाबत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एकत्र बसून निर्णय घेतील., अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकमुखाने निर्णय घेतील असा विश्वास आहे. जर महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भविष्यात राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीत अडचण येणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारने सखोल तपास करावा

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारने पारदर्शक आणि तांत्रिक चौकशी करावी. ब्लॅक बॉक्स तपास, पायलट बदलला का, कॉल रेकॉर्डचा तपास यासारख्या बाबींची चौकशी करावी. महाराष्ट्राच्या मनातील संशय दूर करण्यासाठी सरकारने सखोल तपास करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Jayant Patil
Beed SSC exam copy scam : कॉपीचा नवा फंडा: ‘बीड पॅटर्न’कडून परीक्षा व्यवस्थेची पोलखोल! केंद्रावरील पर्यवेक्षकांसह शिक्षकांचाही हात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com