Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा 'कमबॅक'; 'बेल्स पाल्सी'वर मात! मंत्रालयात बैठक, भेटी...

Dhananjay Munde defeating Bell's Palsy : हेल्स पाल्सी या आजारामुळे मुंडे पुन्हा सक्रीय कधी होणार याची चिंता व्यक्ती केली जात होती. त्यांच्या या आजाराच्या ट्विटनंतर ते आठ दिवसानंतर मंत्रालयाच्या एका बैठकीत दिसले.
Dhananjay Munde
Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या विषयी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. मात्र, 20 फेब्रुवारीला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना 'बेल्स पाल्सी'आजाराची लागन झाल्याचे सांगितले. या आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग बोलताही येत नव्हते.

हेल्स पाल्सी या आजारामुळे मुंडे पुन्हा सक्रीय कधी होणार याची चिंता व्यक्ती केली जात होती. मात्र या आजाराविषयी त्यांनी केलेल्या ट्विटनंतर ते आठ दिवसानंतर मंत्रालयाच्या एका बैठकीत दिसले. या बैठकीची माहिती मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Dhananjay Munde
Ajit Pawar : नांदेडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादांची मोठी घोषणा; चिखलीकरांना भविष्यात वेगळी संधी देण्याचे संकेत

मुंडे यांनी ट्विट करत सांगितले की, त्यांनी आज (शुक्रवारी) मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतला.

मुंडें बैठकीचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये डोळ्याला गाॅगल लावलेले दिसत आहेत. 'बेल्स पाल्सी' आजारामुळे बोलताना अडचण येत असते मात्र धनंजय मुंडे या आजारातून बरे झाल्याचे या फोटोमधून दिसत आहे.

पुन्हा सक्रीय

बेल्स पाल्सी आजाराचे निदान झाल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार यांना कल्पना दिलेली होती, अशी माहिती मुंडेंनी दिली होती. तसेच लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल असे म्हटले होते. त्या प्रमाणे ते पुन्हा कामात रुजू झाल्याचे दिसत आहे. मंत्रालयात त्यांनी काही जणांना भेट देखील दिली.

Dhananjay Munde
Hasan Mushrif : मुश्रीफांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक मदत केली; शिंदेंच्या आमदारांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com