Hasan Mushrif : मुश्रीफांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक मदत केली; शिंदेंच्या आमदारांचा आरोप

hasan Mushrif financial support claim News : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने शक्तिपीठ हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. मात्र, आता निवडणूक संपली आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त शक्तिपीठमुळे नव्हे तर विरोधकांनी जे खोटे नेरटिव्ह सेट केले.
Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre
Hasan Mushrif On Keshavrao Bhosle TheatreSarkarnama
Published on
Updated on

Kolahpur News : महायुतीचे जिल्ह्यातील काही नेते काँग्रेसच्या नेत्यांसोबत काय काम करतायेत हे वरिष्ठांना कळते. महायुतीच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील उमेदवाराला कशी आर्थिक मदत केली हे वरिष्ठांना देखील माहित असल्याचा घणाघाती आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

महायुतीच्या (Mahayuti) प्रकल्पाला महायुतींच्याच नेत्यांना विरोध करता येणार नाही. महायुतीचे जे नेते शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत असतील त्यांनी तो करू नये. महायुतीच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांना राहावे लागेल. महाराष्ट्राच्या विकासाचा हा माईलस्टोन ठरणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.

Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre
Shivsena UBT : ठाकरेंच्या नेत्याची सटकली; शेतकऱ्याला लोखंडी रॉड चुलीत तापवून चटके, लाथा-बुक्यांनी मारहाण

हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ आता झालीच पाहिजे. हद्दवाढ सुद्धा होणारच. शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपण बाजारभावाच्या पाच पटीने किंमत देणार आहोत. या महामार्गात जमीन देणारे काही शेतकरी आम्हाला भेटून विचारत आहेत. या महामार्गाला विरोध कोण करते? लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने शक्तिपीठ हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. मात्र, आता निवडणूक संपली आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त शक्तिपीठमुळे नव्हे तर विरोधकांनी जे खोटे नेरटिव्ह सेट केले.

Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre
Shiv Sena News: ठाकरे सेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी तात्या लागले कामाला! इच्छुकांच्या मुलाखती...

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला. हे हसन मुश्रीफ यांना माहिती नाही का? कोल्हापूर लोकसभेतील महाविकास आघाडीचा विजय म्हणजे शाहू छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे. तो महाविकास आघाडीचा विजय नसल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट करत महायुतीच्या कोणत्याही नेत्याने शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre
BJP Vs Shivens-Ncp : आदळआपट करा, नाराज व्हा; भाजपमागे फरफटत जाण्याशिवाय शिंदे-अजितदादांकडे पर्याय नाही!

विरोधकांना त्यांची जागा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवली आहे. शेतकऱ्यांचा किंवा ज्यांची शेती जात आहे त्यांचा या महामार्गासाठी जमीन द्यायला कोणताही विरोध नाही ही वस्तुस्थिती आहे. मग या नेत्यांनाच याबाबतीत विरोध का? करायचा आहे. विरोधात बसून आता त्यांना काही काम राहिले नाही. म्हणूनच विकास कामात खोडा आणण्याचे काम विरोधक करत आहेत. मी मित्रा या संस्थेवर काम करतो. त्यामुळे राज्याचे प्रकल्प पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे फक्त त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे. ती मर्यादित असल्याचा टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावला.

Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre
Mahayuti News : विधिमंडळ सदस्य नियुक्तीत भाजपची आघाडी तर मित्रपक्षांच्या वाट्याला अद्याप प्रतीक्षाच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com