Dhananjay Munde Court Case : करुणा शर्मा यांच्याशी विवाह नाही, धनंजय मुडेंचा कोर्टात दावा; न्यायाधीश म्हणाले, 'मग मुलं कोणाची...'

Dhananjay Munde Denies Marriage Karuna Sharma Munde : करुणा शर्मा यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांनी 1998 ला विवाह केला आहे. या विवाहापासून त्यांना मुलं आहेत. त्यांचे एकत्रित फोटो देखील आहेत.
Dhananjay Munde Karuna Sharma
Dhananjay Munde Karuna Sharmasarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले होते. मात्र, या आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तर, दोन लाख ही खूप कमी रक्कम असून 9 लाखांची पोटगी देण्यात यावी, अशी मागणी करुणा यांच्याकडून करण्यात आली होती. याबाबत आज (शनिवारी) माझगाव सत्र न्यायायात सुनावणी झाली.

धनंजय मुंडे यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना करुणा शर्मा यांच्याशी धनंजय यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे म्हटले. त्यावेळी न्यायाधीशांनी मग धनंजय मुंडे-करुणा शर्मा यांच्या मुलांचे आई वडील कोण आहेत? असा प्रतिप्रश्न प्रश्न केला. त्यावर मुंडेंच्या वकिलाने धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे मात्र त्यांच्या आईशी अधिकृत विवाह केला नाही, असे सांगितले.

Dhananjay Munde Karuna Sharma
Girish Mahajan statement : बाप-बेट्यामध्ये, सासरा-सुनेमध्ये, तर भावा-बहिणींमध्ये मारामाऱ्या; मंत्री महाजनांचा इशारा नेमका कोणाकडं?

मुलं तुमची आहेत मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत, अशी विचारणा देखील कोर्टाकडून करण्यात आली. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या वकिलाकडून धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह झाला असून त्याविषयी पुरावे देण्यासाठी काही कालावधी देण्याची विनंती कोर्टाला केली.

धनंजय मुंडेंच्या वकिलाने करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांनी काही काळ सोबत घालवला. याचा अर्थ ते पती पत्नी होत नाहीत. पती-पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते. त्यांचे अधिकृत संबंध नव्हते. करुणा या व्यावसायिक असून त्या इन्कम टॅक्स देखील भरतात तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज दाखल केल्याचे म्हटले. धनंजय मुंडेंनी दोन्ही मुलांना स्वीकारलं असून त्यांना नाव देखील दिलाचे धनंजय मुंडेंच्या वकिलाने सांगितले.

1998 मध्ये लग्नाचा दावा

करुणा शर्मा यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांनी 1998 ला विवाह केला आहे. या विवाहापासून त्यांना मुलं आहेत. त्यांचे एकत्रित फोटो देखील आहेत. न्यायालयाने विवाहाचे पुरावे आहेत का? असा प्रश्न केला असता करुणा शर्मांच्या वकिलाने आम्ही पुरावे सादर करू आम्हाला वेळ हवा आहे, असे सांगितले. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आत्ता पाच एप्रिलला ठेवली आहे.

Dhananjay Munde Karuna Sharma
Devendra Fadnavis Solapur Tour : फडणवीसांनी नाकारला आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ; कारणही आले पुढे! (Video)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com