Guardian Minister Dispute : दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

Sanjay Raut's secret explosion : नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पालकमंत्रिपदाच्या वादाला फोडणी दिली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
Sanjay Raut-Mahayuti Leader
Sanjay Raut-Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 26 January : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार धुसफूस सुरू आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक नाराजी व्यक्त करीत आहेत. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये वाद धुसमत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पालकमंत्रिपदाच्या वादाला फोडणी दिली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, असे म्हटले आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद (Guardian Minister ) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्यात आले होते. महागार्मावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्रिदासाठी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र, त्यांना हे पद न मिळाल्याने ते नाराज होते.

Sanjay Raut-Mahayuti Leader
Solapur News : जीएसबीने मृत्यू झालेल्या सोलापूरच्या तरुणाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवणार; प्रशासनाने केले जनतेला हे आवाहन...

दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. त्यावरून संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुरवळण्याचा प्रयत्न केला होता. पालकमंत्रिपदाला स्थगिती हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, असा दावा राऊतांकडून करण्यात आला होता.

संजय राऊत म्हणाले, पालकमंत्रिपदासाठी महायुती सरकारमध्ये गॅंगवार सुरू आहे, हे बिनडोकपणाचे लक्षण मानावे लागेल. पालकमंत्रिपदाच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हतबल आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात काही निर्णय घेतले. त्यांचा अधिकार सर्वांत महत्वाचा अधिकार असतो. त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणे ते मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाची नियुक्त्या करतात.

Sanjay Raut-Mahayuti Leader
Shivsena Politic's : संभाजीनगरमध्ये पालकमंत्री शिरसाट अन्‌ खैरेंची हातमिळवणी!

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ते परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रिपदाच्या नियुक्ती स्थगिती देण्यात आलेली आहे. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे. दिल्लीतून अशा प्रकारे दबाव आणण्याचे काम कोणी करत असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांचा अवमान आहे, असे आम्ही मानतो. पालकमंत्रिपदासाठी दबाव आणून एक नवीन पायंडा पडताना दिसत आहे, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com