Dhananjay Munde: '...तर मी राजीनामा देणार', मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा

Dhananjay Munde Ready to Resign if CM Demands: संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित अससेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे आज (बुधवारी) दिल्ली येथे आले होते. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत निर्णय होईल, असा चर्चा होत्या. मात्र, माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी ते आपल्या मंत्रालयाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्र्‍यांना भेटायाल कामा निमित्त दिल्ली आल्याचे स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित अससेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील भेटल्या.

धनंजय मुंडे यांना राजीनाम्या विषयी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर आपण राजीनामा देऊ. मात्र मला नैतिकतेने वाटत नाही मी दोषी आहे. माझी नैतिकता माझ्या लोकांबद्दल प्रमाणिक आहे. जी घटना घडली त्या बद्दल जे बोलतोय ते प्रमाणिकपणाने बोललोय. जे घडलय त्यामध्ये मी दोषी आहे मला वाटत नाही.'

Dhananjay Munde
Supriya Sule : 'एकामुळे अजितदादांच्या पक्षाची 50 दिवस हेडलाईन'; खासदार सुळेंनी मंत्री मुंडेंना डिवचलं

मला गेली 51 दिवस टार्गेट गेले गेले आहे. मात्र, मी या 51 दिवसांत म्हटलो आहे की, संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाला आहे त्यात जो कोणी दोषी असतील जो कोणी तपासात सापडतील त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.

अजिदादांच्या स्वागताची तयारी नाही...

धनंजय मुंडे म्हणाले की, 'उद्या अजितदादा बीडला येत आहेत. उद्या डीपीसीची पहिलीच बैठक आहे. दादा ज्या ज्यावेळी बीडला आले त्या त्या वेळी आम्ही त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. मात्र आता जे सुरू आहे त्यावर त्यांच्या स्वागताची अभूतपूर्व तयारी केली तर बातम्या काय येतील? हे मला माहीत असल्यामुळे उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काही तयारी केली नाही'

Dhananjay Munde
Congress Manifesto 2025 : मोफत वीज, 500 रुपयांत गॅस अन् बरंच काही, असा आहे दिल्लीकरांसाठीचा 'काँग्रेस'चा जाहीरनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com