
Mumbai News, 28 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही पुरावे देत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी देखील अजितदादांची भेट घेतली आहे. शिवाय धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळेच कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच यावेळी त्यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत एक खळबळजनक दावा देखील केला आहे.
संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांची (Ajit Pawar) भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो सापडला नाही आणि आता तो सापडेल असं वाटतं नाही. कारण तिथे जे काय प्रकार चालतात, जे अनुभव आम्हाला आले आहेत त्यावरून असं वाटतं, असं क्षीरसागर म्हणाले.
तसंच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद असताना सर्व कारभार वाल्मिक कराड बघायचा असा दावा केला. तसंच यावेळी त्यांनी आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचंही म्हटलं. क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक प्रकरण आता बाहेर येत आहेत. आधी लोक बोलत नव्हते पण ज्यांच्या कुटुंबाला त्रास झाला आहे ते पुढे येऊन बोलायला लागले आहेत. अनेक जण येतात आणि त्यांना जो काही त्रास झालाय ते सांगतात.
दरम्यान, यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार असल्याच्या मागणीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर विषय घेतला पाहिजे. आम्ही जे सांगितलं तेच सर्व समोर येत आहे. वाल्मिक कराडला जी व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. ती मुंडेंना मंत्रिपद असल्यामुळेच मिळत आहे. त्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शिवाय या आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.