Manoj Jarange On Dhananjay Munde : एसआयटी, सीआयडीकडे धनंजय मुंडे विरोधात भक्कम पुरावे, त्यांना सहआरोपी करा!

Manoj Jarange demands action against Dhananjay Munde, citing strong evidence and requesting the Chief Minister to file a case against him as a co-accused. : धनंजय मुंडे यांचा खुनाशी संबंध नाही असं फडणवीस सांगत असतील तर ते खोटे बोलत आहेत. त्यांनी तसे न करता एसआयटी, सीआयडीकडे असलेले पुरावे बघावेत.
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
Manoj Jarange Patil Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या आणि त्याचे संताप आणणारे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आरोपींच्या फाशीची मागणी केली जात आहे. वाल्मीक कराड हा या खून प्रकरणातील नंबर एकचा आरोपी असला तरी त्याला अभय देणारे धनंजय मुंडेच आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. सीआयडी, एसआयटीकडे वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा अनेक व्यवसायातील भागीदार असल्याचे पुरावे सापडले आहेत.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अनेक मालमत्ता कराड यांच्या नावावर आहेत. मुंडे यांच्या मार्गात येणारा कुठलाही अडथळा दूर करण्याचे काम वाल्मीक कराड करत होता, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचे मान्य केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली.

धनंजय मुंडे यांचा खुनाशी संबंध नाही असं फडणवीस (Devendra Fadnavis) सांगत असतील तर ते खोटे बोलत आहेत. त्यांनी तसे न करता एसआयटी, सीआयडीकडे असलेले पुरावे बघावेत. मग त्यांना वेगळ्या पुराव्यांची गरज भासणार नाही. तपास यंत्रणांकडे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे शेकडो पुरावे आहेत. त्या आधारे धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल करा.

Manoj Jarange Patil Dhananjay Munde
Manoj Jarange On Munde Resign : फडणवीस-अजितदादांचे आभार मानत जरांगे मुंडेंवर बरसले; म्हणाले ‘त्यांची मग्रुरी, मस्ती अजूनही कायम’

खंडणी आणि त्यातून संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड व इतर आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले होते, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. एवढेच नाही,तर या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीनेही धनंजय मुंडे यांना फोन केल्याचे पुरावे तपास यंत्रणांकडे आहे. धनंजय मुंडे मंत्री असतांना बीड जिल्ह्यातील त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची कामे वाल्मीक कराड करत होता. संपर्क कार्यालयातील सगळा कारभार तोच पाहत होता.

Manoj Jarange Patil Dhananjay Munde
Dhananjay Munde Politics: धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार की टळणार?

अवादा कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यात आरोपींची बैठक झाली होती, हे ही खरं आहे. त्यामुळे खंडणी आणि खून प्रकरणात धनंजय मुंडेचा रोल असल्याचे पुरावे एसआयटी, सीआयडीकडे आहेत. पुरावे नसल्याचे फडणवीस सांगत आहेत, मात्र ते खोटं बोलत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे पुरावे असल्याचे मान्य करून धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करून 302 चा गुन्हा दाखल करायला सांगावे, अशी मागणी जरांगे यांनी माध्यमांशी बोलतांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com