Dhananjay Munde Politics: धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार की टळणार?

Dhananjay Munde; resignation of ministry, what of corruption allegation in agriculture-धनंजय मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपांनंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Dhananjay-Munde.jpg
Dhananjay-Munde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभर वातावरण तापले. राज्य सरकार अडचणीत आले. विशेषता गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका झाली. एकंदरच महायुतीचे सरकार बचावात्मक आहे.

सरपंच देशमुख यांच्या हत्येबाबत न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रातील काही संताप जनक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा राजीनामा घेण्यास विलंब झाल्याने देखील सरकारवर टीका होत आहे.

Dhananjay-Munde.jpg
Eknath Shinde Politics: आक्रमक शिवसेना शिंदे पक्ष वाढवणार धनंजय मुंडेंच्या अडचणी!

मंत्री मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वातावरण निवळलेले नाही. अद्यापही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून आंदोलनाचे सत्र सुरू आहे. विरोधकांनीही यावर आपली टीका सौम्य केलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.

Dhananjay-Munde.jpg
Devendra Fadnavis कोल्हापूर दौऱ्यावर... 'साहेब, या दोन मुद्द्यांना आज तडीस लावाच!'

मंत्रि मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. याबाबतचे विविध पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करण्यात आले आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या आरोपांचे काय होणार? याची उत्सुकता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे.

माजी मंत्री मुंडे आणि वाल्मीक कराड तसेच मुंडे यांच्या पत्नी यांच्या संचालक असलेल्या कंपनीला परळी येथे औष्णिक विद्युत केंद्राचे राख देण्याचा करार झाला आहे. हे काम प्रथमदर्शनी वाल्मीक कराड आणि त्यांचे सहकारीच करीत होते. त्यातून कोट्यावधींचा फायदा होत असल्याचे दिसते याबाबत "ऑफिस ऑफ प्रॉफिट"चा प्रश्न येत असल्याने मुंडे यांचे विधिमंडळाचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर शासन काय निर्णय करणार ही देखील चर्चा आहे.

माजी मंत्री मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना (डीबीटी) राबविताना अनेक नियम बदलले. त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सोयाबीन आणि कापूस प्रक्रिया योजनेअंतर्गत डीबीटी योजनेतून हा घोटाळा झाल्याचा आरोप होतो आहे.

राज्यात पिक विमा योजना राबविताना अशाच प्रकारे घोटाळा झाला आहे. यामध्ये ई-सेवा केंद्र आणि अन्य मध्यस्थांच्या माध्यमातून एक रुपयात विमा योजना राबविताना अनेक जमीन नसलेल्या देखील शेतकऱ्यांच्या नावे विमा काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व आरोपांमध्ये किमान एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातो.

राजीनामा झाला आता अन्य विषय बाजूला तर पडणार नाही ना, अशी स्थिती आहे. सध्या तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंडे यांना अधिक दुखावण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा विषय मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com