Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार? करुणा शर्मांनी घेतली बड्या नेत्याची भेट

Political News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी राजीनाम्याची मागणी केली.
Dhananjay Munde, Karuna Sharma
Dhananjay Munde, Karuna SharmaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या काळातील पीकविमा घोटाळा, आणि डीपीडीसीमधील निधीत घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना बुधवारी करुणा शर्मा यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार आहेत.

धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून करुणा शर्मा यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आपल्या तक्रारीसंदर्भाने पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानंतर अखेर, आज करुणा शर्मा यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेऊन आपली बाजू त्यांच्याकडे मांडली.

Dhananjay Munde, Karuna Sharma
Uddhav Thackeray strategy : उद्धव ठाकरेंची 'ती' रणनीती गळती रोखणार; शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी 'हा' खास प्लॅन

या भेटीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली. तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे करुणा शर्मा यांनी आपली कैफीयत आता सुप्रिया सुळेंकडे मांडली आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
BJP Plan Against Satej Patil : विधानपरिषद निवडणुकीसाठी सतेज पाटलांची सगळीकडून कोंडी करण्याचा भाजपाचा 'प्लॅन'!

बीडमधील मस्साजोग प्रकरणी लक्ष घातल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दोन दिवसांपूर्वीच बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाच्या अनुषंगाने बीडला पुन्हा भेट दिली. मंत्री मुंडेंच्या निकटवर्तीयांवर होत असलेल्या आरोपींना कुणीही पाठीशी घालू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
BJP CM in Delhi : मोदी-शाह ‘ती’ चूक करणार नाहीत! मुख्यमंत्रिपदाचे 52 दिवस, 27 महिने, 31 महिने...

एकीकडे बीड प्रकरणात लक्ष घातलेल्या सुप्रिया सुळे यांनी करुणा शर्मांना भेट दिली. तसेच, त्यांची बाजू देखील ऐकून घेतली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर करत, 'सुप्रिया ताईंसोबत भेट..' असे म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोटगी संदर्भातील खटल्यात न्यायालयाने करुणा शर्मा यांना दिलासा देत पोटगी देण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडेंना दिले आहेत. या सर्व बाबींचा ससेमिरा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी लागला असल्याने येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
BJP New President: भाजपच्या गोटातून मोठी बातमी: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नड्डांनंतर 'हा' चेहरा, मोदी-शाहांनी दिले संकेत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com