Uddhav Thackeray strategy : उद्धव ठाकरेंची 'ती' रणनीती गळती रोखणार; शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी 'हा' खास प्लॅन

Shinde Sena operation tiger News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागे धक्के देणे अजूनही सुरूच आहे. आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउटगोइंग रोखण्यासाठी व शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे.
Shivsena Anniversary
Shivsena AnniversarySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेत जून 2022 मध्ये उभी फूट पडली. त्यावेळी 50 आमदार, डझनभर खासदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. यावेळी झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेसपासून शिंदेंकडून ठाकरेंचा एक एक शिवसैनिक सोबत घेतला जात आहे. त्यातच आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागे धक्के देणे अजूनही सुरूच आहे. आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउटगोइंग रोखण्यासाठी व शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण पहाता विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे चित्र दिसत नाही. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठी गळती लागली आहे. राज्याच्या विविध भागात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे.

Shivsena Anniversary
Congress News : काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर; हर्षवर्धन सपकाळांची कसोटी?

गेल्या काही दिवसापासून हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात होती. त्यानुसार प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी आता सर्व ठाकरे सेनेच्या अनुभवी नेत्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व नेत्यांची शिवसेना (Shivsena) भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होईल. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ही ठाकरे सेनेची रणनिती आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत. ही रणनीती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होणार का? भविष्यात तयार केली जाणारी रणनीती ठाकरेंचा होणार आउटगोइंग थांबवणार का? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shivsena Anniversary
Mahayuti News : सीएम फडणवीसांकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील आमदाराला बळ; म्हणाले, 'तुमच्या पाठीशी मुख्यमंत्री ...'

डॅमेज कंट्रोलच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहेत. राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू नेते जाणून घेणार आहेत. संघटनेत विश्वास संपादन करून एकमेकांमध्ये समन्वय राखत संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Shivsena Anniversary
BJP Plan Against Satej Patil : विधानपरिषद निवडणुकीसाठी सतेज पाटलांची सगळीकडून कोंडी करण्याचा भाजपाचा 'प्लॅन'!

पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काहीजण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर 14 जणांवर नेते पदाची, 43 जणांवर उपनेते पदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे.

Shivsena Anniversary
BJP CM in Delhi : मोदी-शाह ‘ती’ चूक करणार नाहीत! मुख्यमंत्रिपदाचे 52 दिवस, 27 महिने, 31 महिने...

हे 14 नेते दर मंगळवारी भेटणार

ठाकरेंच्या शिवसेनेमधील 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार आहे. यामध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते,संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव,विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब,अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू यांचा समावेश आहे. ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना-भाजप यापैकी एका पक्षाची निवड करत आहेत.

Shivsena Anniversary
BJP New President: भाजपच्या गोटातून मोठी बातमी: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नड्डांनंतर 'हा' चेहरा, मोदी-शाहांनी दिले संकेत?

डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न

माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश, त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. माजी आमदार सुभाष बने यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. त्यानंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्या सोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे.

Shivsena Anniversary
Shivsena Politics : गद्दारी, कोणासोबत? वैभव नाईकांनी घेतली शिवजयंतीला शपथ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com