Dhananjay Munde : मंत्रिपदाबाबत अजितदादांचे सूचक विधान अन् आता मुंडेंचा विरोधकांना इशारा; म्हणाले, यापुढे...

Dhananjay Munde Responds to Allegations : मागच्या काही दिवसांमध्ये माझा काहीही संबंध नाही, अशा विषयांवरून सलग 200 दिवस आमची मीडिया ट्रायल केली गेली, असे धनंजय मुंडे म्हणाले.
Dhananjay Munde And Ajit Pawar .jpg
Dhananjay Munde And Ajit Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत सूचक विधान केले आहे. मुंबई हायकोर्टाने मुंडे यांच्या काळात कृषी विभागात झालेली खरेदी प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचा निकाल दिला नुकताच दिला आहे. त्यानंतर अजितदादांनी नुकतेच हे विधान केले होते. आता धनंजय मुंडेही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

ठाणे येथे रविवारी आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात मी कधीच जात पाहून काम केले नाही, कधी करायची तशी वेळही येणार नाही, अशी शिकवणच मला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व माझे वडील स्व. पंडित अण्णा यांच्याकडून मिळालेली आहे. स्व. मुंडे साहेबांचा संघर्ष मी अत्यंत जवळून पाहिला व अनुभवलेला आहे. त्यामुळे संघर्ष आमच्या रक्तात आहे, असे मुंडे म्हणाले.

मागच्या काही दिवसांमध्ये माझा काहीही संबंध नाही, अशा विषयांवरून सलग 200 दिवस आमची मीडिया ट्रायल केली गेली. मात्र मी शांत राहून व संयम बाळगून प्रत्युत्तर दिले नाही. कुणा एकाचा दोष असेल त्याला नक्कीच शिक्षा मिळावी, मात्र त्याडून काहींनी आमच्या संपूर्ण कुटुंबांची, आई, मुले-बाळे यांची, सबंध जातीची, जिल्ह्याची आणि जिल्ह्याच्या मातीची बदनामी केली. त्या सर्व गोष्टींना संयमाने तोंड दिले, असे मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde And Ajit Pawar .jpg
Bihar Election : वादग्रस्त ‘SIR’चा अहवाल आयोगाकडून जाहीर; धक्कादायक आकडे समोर, राजकीय पक्ष हादरले...

जात म्हणून कुणी द्वेष करत असेल त्याला द्वेषाने उत्तर देणार नाही, आपल्या समाजाचा नक्कीच अभिमान बाळगू, मात्र इतर कुठल्याच समाजाचा द्वेष करणार नाही. मागील काही महिन्यांत अनेक आघात, आरोप आणि बदनामी सहन केली. मात्र, आमच्या अस्मिता आणि गुणवत्तेवर आक्षेप घेणाऱ्यांचे चुकीचे आरोप यापुढे सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला.

Dhananjay Munde And Ajit Pawar .jpg
kiren Rijiju News : संसदेत ‘स्मोकिंग रूम’ची किरेन रिजिजूंनी केली होती मागणी; अध्यक्षांच्या कानातून धूर निघाला...

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात होती. तसेच याच काळात त्यांच्यावर ते कृषी मंत्री असताना झालेल्या खरेदीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com