One Nation One Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'वन नेशन, वन इलेक्शन' चा दिलेला नारा पूर्ण होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात साम टिव्हीने वृत्त दिले आहे.
'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) कायदा करण्याच्या तयारीत आहेत. एनडीएतील सर्व पक्षांचे 'वन नेशन, वन इलेक्शन' पाठींबा असल्याचे देखील सांगितले जात आहे.
देशात सतत निवडणुका होत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण होतो.शिवाय निवडणुकीवरील खर्चात देखील मोठी वाढ होत असते. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते.
त्यासाठी एक देश निवडणुकाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे. जर सर्व निवडणूका एकत्र झाला तर मोठ्या खर्चात कपात होईल, असा युक्तिवाद केंद्रीय मंत्र्यांकडून केला जातो आहे.
प्रशासकीय, शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुरक्षा दल, शासकीय कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी जात असतात. निवडणुका एकत्र ठेवल्यास सुरक्षा कर्मचारी तसेच निवडणुकीचे काम करणारे महसूल विभागतील कर्मचाऱ्यांचा व्याप कमी होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.