Dhangar Reservation : धक्कादायक! धनगर आरक्षण आंदोलनस्थळी तरुणाने घेतलं विष

Dhangar Reservation young man took poison : धनगर आरक्षणासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारने धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservationsarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation :धनगर आरक्षणासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारने धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.

मात्र, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी संजय चौगुले नावाच्या व्यक्तीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

उपोषणस्थळी असलेल्या व्यक्तींनी संजय चौगुले यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न असफल झाले. संजय यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार संजय हे ईश्वर वठार येथील आहेत.

Dhangar Reservation
Mahayuti News : अखेर शिरसाट, अडसूळ यांची इच्छापूर्ती; शिंदे सरकारकडून मोठं बक्षीस; गोगावलेंचं काय ?

यापूर्वी अमोल देवकाते यांनी देखील धनगर आरक्षणासाठी विष प्राशन केले होते‌. त्यानंतर आज पुन्हा संजय चौगुले यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने आरक्षणचा प्रश्न पेटला आहे.

पंढरपूरमध्ये राज्यव्यापी उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता. सरकारने समितीची घोषणा करूनही आंदोलन सुरुच आहे.

सरकारने काय आश्वासन दिले?

रविवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच असल्याविषयी जीआर काढण्यात येणार आहे. आदिवासींच्याधर्तीवर धनगर समाजाला योजना देण्यात येणार आहेत.

Dhangar Reservation
Haryana Congress : हरियाणात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?; चौधरी बीरेंद्र सिंह यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com