Thackeray brothers march: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तरीही ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार; समोर आले मोठं कारण

Dharmendra Pradhan's resignation News : उद्धव व राज ठाकरे यांच्याकडून रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची मोठी तयारी करण्यात आली होती.
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey
Uddhav-Thackrey-Raj-ThackereySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने नीट पेपरफुटीनंतर गेल्या २५ दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु होते. या आंदोलनकर्त्यासमोर केंद्र सरकार झुकले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा पाठवून दिला असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. त्यानंतर प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

त्यातच उद्धव व राज ठाकरे यांच्याकडून रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाची मोठी तयारी करण्यात आली होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच आता ठाकरे बंधू रविवारी मोर्चाऐवजी आता अभिनंदन मोर्चा काढणार असल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची शनिवारी चार वाजता मातोश्रीवर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शनिवारीच मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे टीजर प्रसिद्ध करण्यात आले होते. तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीने मोर्चाची मोठी तयारी करण्यात आली होती. त्यातच शुक्रवारी शिवाजी पार्क परिसरात नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केले. या प्रसंगी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरुन अभिजित दिपके यांनी मुंबईतील तरुणाईसोबत संवाद साधला होता.

त्यातच शनिवारी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. प्रधान यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा पाठवून दिला असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. या राजीनाम्याच्या घोषणेनंतर शिवसैनिक व मनसैनिकानी एकच जल्लोष केला. त्यानंतर आता रविवारी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करून त्याऐवजी आता अभिनंदन मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच आता ठाकरे बंधू रविवारी मोर्चाऐवजी आता अभिनंदन मोर्चा काढणार असल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी चार वाजता मातोश्रीवर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com