शिरपूर तालुक्यात आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांनी आपले वर्चसव कायम राखले आहे. या गटात आठही जागा भाजपकडे गेल्या आहेत. आमदार अमरीश पटेल हे पूर्वी काँगेस पक्षात होते. त्या वेळी शिरपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस चे वर्चस्व होते. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी आपला दबदबा कायम राखला आहे.
काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीचे आमदार कुणाल पाटील (mla Kunal Patil) यांनी महाविकास आघाडीने बहुतेक जागांवर भाजपला धूळ चारली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.''महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या, पैसे वाटले. तरी देखील पराभव झाला. बिघाडी सरकारच्या वसुली विरोधात जनतेने कौल दिला,'' असा गंभीर आरोप जयकुमार रावल यांनी केला आहे.
धुळे जिल्हा परिषद : कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 06, शिवसेना – 01,राष्ट्रवादी काँग्रेस – 02, काँग्रेस – 01,
धुळे पंचायत समिती : कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 12,शिवसेना – 03, राष्ट्रवादी – 01,काँग्रेस – 03
धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. त्यानंतर भाजप नेते जयकुमार रावल यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीविरोधात दिलेला हा कौल आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या. पैसे वाटले. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला, अशी टीका रावल यांनी केलीय.
काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीचे आमदार कुणाल पाटील (mla Kunal Patil) यांनी महाविकास आघाडीने बहुतेक जागांवर भाजपला धूळ चारली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपचे नेते जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी त्यांच्यावर पलटवार करीत ठाकरे सरकारवर (Thackeray government) गंभीर आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.