Dilip Walse Patil Politics : 'निवडणुकीचं युद्ध आहे, तयारी ठेवा...', दिलीप वळसे पाटलांनी फुंकले रणशिंग, खासदार कोल्हेंवरही निशाणा

Dilip Walse Patil NCP Amol Kolhe : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे रणशिंग दिलीप वळसे पाटील यांनी फुंकले आहे. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama
Published on
Updated on

डी. के. वळसे पाटील

Dilip Walse Patil News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. जाहीर कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'हे निवडणुकीचं युद्ध आहे, जय्यत तयारी ठेवा. गावातील गट-तट आणि भांडणे मिटवून एकदिलाने काम करा. पक्षाचे बळ हे संघटनात आहे.'

'भीमाशंकर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंदिर, पर्यटन सुविधा, रस्ते, आणि पायाभूत सोयीसाठी वापरला जाणार आहे. भीमाशंकर रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काहींनी आंदोलन केले, परंतु हा रस्ता केंद्र सरकारचा आहे. तरीदेखील आम्हीच त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. खासदारांना प्रश्न विचारला जात नाही, पण आम्ही कामातून उत्तर देतो.', असा टोलाही त्यांनी खासदार कोल्हेंना लगावला. मंचर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

निकमांना योग्य वेळी उत्तर देणार

भीमाशंकर कारखाना आणि इतर बाबतीत देवदत्त निकम वारंवार आरोप करत असतात. योग्य वेळी त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.तसेच आपण मंत्रिमंडळात नसलो तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाची धोरणनिश्चिती करणाऱ्या या समितीत माझा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही विकासकामाला अडथळा येत नाही. निधीचा स्रोत कायम आहे,' असे देखील त्यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
Gulabrao Patil : 'दुष्काळ पडला तरी अन् नाही पडला तरी लोक...', शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

आपण जिंकणार...

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेड–सिन्नर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणला, पण नारळ फोडायला मात्र इतर जण पुढे दिसतात. काम मी केलं, पण श्रेय दुसऱ्यांनी घेतलं , चालायचं. कारण जनता सगळं पाहते. जनतेला सत्य कळतं आणि वेळ आल्यावर ती योग्य न्याय देते. आपण गट-तट विसरूया. ही निवडणूक फक्त पक्षाची नाही, आपल्या अस्तित्वाची आहे. गावागावात जा, लोकांशी संवाद साधा, पुन्हा विश्वास जिंका. मी आहे, दिलीप वळसे पाटील आहेत. आपल्यासोबत नेतृत्व आहे. आता फक्त मनापासून काम करा, जिल्हा परिषद पंचायत समिती व मंचर नगरपंचायतीच्यासर्व जागा आपणच जिंकणार आहोत.

Dilip Walse Patil
Devendra Fadnavis: 'PMC'च्या निवडणुकीत भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागांबाबत CM फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com